अशोक कांबळे ऊस तोडणी व वाहतूक ग्रुपच्या ऊसतोड कामगारांची बोळवण
सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांनी ऊसतोड कामगारांचा केला सन्मान : एक सामाजिक उपक्रम
माजलगाव:( प्रतिनिधी शेख अखिल): ऊस तोडणी व वाहतूक गळीत हंगाम 2023/24 या गळित हंगामाचा शेवट करत अशोक कांबळे ऊस तोडणी व वाहतूक ग्रुपचे ऊसतोड कामगार यांनी या हंगामाचा शेवट करत दीड लाख रुपये उचलीचे काम केले आहे. त्यांच्या या कामाचे मोल म्हणून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक दत्ता कांबळे यांनी ऊस तोडणी गळीत हंगामाचे शेवट केल्याबद्दल ऊसतोड मजुराच्या प्रत्येक जोडीला प्रत्येकी ड्रेस व साडी भेट देऊन बोळवण केली .यावेळी जेवणात गुलाब जामुन, चक्की, पापड व तीन प्रकारच्या भाज्या अशा गोड स्वरूपाचे जेवण देण्यात आले. यावेळी अशोक कांबळे ऊस तोडणी व वाहतूक ग्रुपचे मालक अशोक कांबळे यांचा व ऊसतोड मजूर यांचा सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांच्याकडून सन्मान करत एक सामाजिक उपक्रम घडवून आणला, अशाच पद्धतीने जिल्हाभरात ऊसतोड मजुरांचा व वाहतूकदार मुकादमांचा सन्मान व्हावा या आशेतून हा सामाजिक उपक्रम केला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांनी यावेळी सामाजिक माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे. यावेळी दत्ता कांबळे यांच्यासह अशोक कांबळे ग्रुपचे संचालक श्रीअशोक कांबळे ,संचालक सुनील कांबळे सर ग्रुपचे मॅनेजर सुधाकर कांबळे मुकादम रमेश कांबळे, मुकादम अंशीराम कांबळे मुकादम, खंडू खंडागळे मुकादम पप्पू कसबे, मुकादम लक्ष्मण वाघमारे ,माजी सरपंच रामेश्वर, शेंडगे विठ्ठल कांबळे, छगन क्षीरसागर, निवृत्ती हिवाळे, मुकुंद हिवाळे, किसन लोखंडे, नाथाभाऊ खडसे, कल्याण भारस्कर, कृष्णा शिंदे, बडे अण्णा यांच्यासह पत्रकार अनंत घडसिंगे सह ऊसतोड मजूर व मुकादम यांची उपस्थिती होती.