चौसाळा येथिल हॉटेल तुळजा भवानीवरती चौसाळा पोलिसांची धाडसी कारवाई
*पोलीस उपनिरीक्षक पानपाटील यांच्या कारवाईने अवैध धंदाना लागला लगाम*
(माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल) बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील अवैध धंदयानी डोके वर काढले असुन परिसरात अवैध दारू, विक्री , गावठी दारू आदी प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची माहीती कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील यांना समजल्यानंतर त्यांनी या अवैध धंदयावरती धाडस कारवाई करत अवैध धंदे चालकात खळबळ उडवुन दिली आहे. आज पुन्हा चौसाळा शिवारातील चौसाळा-पारगाव जाणारया रस्तयालगत असनारया हॉटेल तुळजाभवानी ढाब्यावरती छाप मारून देशी-विदेशी दारू अंदाजे किमंत४६१० रूपये चा मुद्देमाल जप्त करून आरोपी अक्षय भगवान सांळुके रा.चौसाळा याच्या विरूध्द पो.ठा.नेकनुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील, चौसाळा पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार खटाणे साहेब,पो,ना,मुरूमकर साहेब , पो,ना,डिडुळ साहेब, पो,ना, घुले ईत्यांदीनी केली आहे या धाडसी कारवाईने अवैध धंदे चालकांची झोप उडाली आहे.