बीडच्या पालवण चौकात तरुणाचा निर्घुण पणे खून....
बीड तालुक्यातील लिंबारुदेवी इथे घडलेल्या खुनाच्या घटनेला 24 तासाचा कालावधी लोटत नाही तोच बीड शहरातील पालवन चौकात एका चाळीस वर्षे तरुणाची निर्घुण पणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी दि.20/01/2023 सकाळी बातमी आली खुनाच्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे, दरम्यान घटनेची माहिती होताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला असून पोलीस तपास करत आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिगा येथील दत्ता राधाकिशन इंगळे वय 40 वर्ष या तरुणाचा बीड शहरातील धानोरा रोड परिसरातील पालवन चौक परिसरात निर्घुणपणे खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकिस आली मयत दत्ता इंगळे हा बीड शहरातील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळते घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाले शवविच्छेदनासाठी मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून पुढील पोलीस पुढील तपास करीत आहे.