जागतिक कामगार दिनानिमित्त मादळमोही येथे महिला कामगार मेळाव्याचे आयोजन : शाहिन पठाण
सखाराम पोहिकर
तालुका प्रतिनिधी गेवराई
गेवराई ( प्रतिनिधी ) दिनांक 29 एप्रिल गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे जागतिक कामगार दिनानिमित क्रांती महिला असंघटित कामगार युनियनच्या वतीने सघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याचा मेळावा मादळमोही येथे 1 मे 2024 रोजी सकाळी 11 = 00 वाजता घेण्यात येणार आहे आशी माहिती क्रांती महिला असंघटीत कामगार युनियन संघटनेच्या अध्यक्षा शाहीन पठाण यांनी प्रमुख कार्यकर्त्याच्या जातेगाव . येथील बैठकीत ही माहिती दिली आहे .
1 मे 2024 रोजी जागतिक कामगार दिनानिमित्त होणारी बैठक क्रांती महिला असंघटित कामगार युनियनची महत्वाची बैठक असून या बैठकीमध्ये संघटनेच्या वाढीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र देणे सभासद नोंदणीचा आढावा घेणे संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रश्न आणि आडीआडचणी समजून घेणे याचाही यावेळी विचार करण्यात येणार आहे
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे गाव पातळीवरील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना बाहेर घ्यावी कामाला जावे लागते बाहेरगावी मजुरांना कामाला जावे लागल्याने बालविवाह महिलांच्या गर्भाशयाच्या पिशव्या काढणे स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण थांबणे असे अनेक प्रश्न उद्भवले जातात आहेत त्यामुळे मजुरांना गावातच काम उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला भविष्यात काम करावे लागेल असे आव्हान कडू दास कांबळे यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये केले या संदर्भाने एक मे 2024 रोजी आपण ठोस कृती कार्यक्रम घेऊन पुढे गेले पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी योग्य त्या सूचना कराव्यात असे यावेळी सांगण्यात आले या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये क्रांती महिला युनियन संघटनेच्या प्रदेश संघटक शकुंतला घुगासे मराठवाडा अध्यक्ष मंगल राठोड जिल्हाध्यक्ष कविता डोंगरे गेवराई तालुका अध्यक्ष मनीषा शरंगत आकांक्षा घाटूळ रोहिणी राऊत मंदाताई चौधरी यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या