डॉ . सुजित उत्तम हजारे यांना एम बी बी एस पदवी प्रदान
सखाराम पोहिकर
तालुका प्रतिनिधी गेवराई
गेवराई . ( प्रतिनिधी ) दिनांक 16 एप्रिल बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम कचरू हजारे यांचे चिरंजीव डॉक्टर सुजित उत्तम हजारे यांना एमबीबीएस पदवी सोमवारी लातूर येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रधान करण्यात आले डॉक्टर सुजित हजारे यांनी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण केल्या असून एम बी बी एस च्या सर्व वर्षाच्या परीक्षेत सुजित ने घवघवीत यश मिळविले आहे इंटरशिप ( अंर्तवास )संपल्यानंतर सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी लातूर येथे पदवीदान सोहळा संपन्न झाला डॉक्टर सुजित हजारे यांचे प्राथमिक शिक्षण बीड येथील संस्कार विद्यालयातून तर महाविद्यालयाने शिक्षण बलभीम महाविद्यालयातून झाले आहे त्यानंतर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचा एमबीबीएस साठी नंबर लागल्यानंतर त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले लातूर येथे झालेल्या कार्यक्रमास नातेवाईक मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित होते यापुढे वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेऊन रुग्णांची सेवा करण्याचा मानस असल्याचे डॉक्टर सुजित उत्तम हजारे यांनी सांगितले डॉक्टर सुजितच्या या यशाबद्दल एडवोकेट विश्वनाथराव मगर उत्तमराव पवार नागसेन धन्वे डॉक्टर संतोष तुपेरे लक्ष्मण हजारे डिके जाधव प्राध्यापक गंगाधर घोडेराव भारत मगर रघुनाथ वक्ते भाऊराव उपदेशे कचरू घोडेराव दिलीप जाधव अजय हजारे शरद नगर राहुल हजारे अविनाश मगर विकास वक्ते देविदास हजारे आनंद हजारे महेंद्र घोडेगाव प्रदीप उपदेशे विशाल वक्ते राजेंद्र कोरडे संजय कोरडे नितीन जावळे नोबेल हजारे आदींनी अभिनंदन केले आहे डॉक्टर सुजित हजारे यांचे शिरस मार्ग येथील ग्रामस्थ जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे