विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करावी : संजय (भैय्या ) सोनवणे
सखाराम पोहिकर
तालुका प्रतिनिधी गेवराई
गेवराई (प्रतिनिधी ) दिनांक 11 एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या वर्षाची डॉ बाबासाहेब आंबेडकर या महा मानवांची जयंती ही सामाजिक उपक्रमाने व समाज उपयोगी कामे करून साजरी करावी असे आवाहन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष बहुजनांचे नेते संजय (भैय्या ) सोनवणे यांनी केले आहे
बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संघर्षमय जीवनामध्ये अनेक सामाजिक उपक्रम अनेक दलित शोषित वंचितांच्या कल्याणासाठी व त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलने चळवळ सत्याग्रह उभी केली आहे त्यांचा त्याग त्यांचा आदर्श त्यांची शिकवण आत्मसात करून आंबेडकरी समाजाने करून आंबेडकरी समाजाने समाजाच्या हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत व शिस्तप्रिय मार्गाने साजरी करावी असे आवाहन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे नेते पक्ष प्रमुख संजय (भैय्या ) सोनवणे यांनी केले आहे.
पटेल 82 न्यूज़ लवकर येत आहे, पुन्हा आपल्या सेवेत येत आहे सोबत वायरल इंडिया न्यूज व दिल्ली क्राइम न्यूज़ सह