चोरीला गेलेले वाहन शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथील अमंलदार यांनी डिटेन करून मुळ मालकास केले परत
शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अमंलदार पोहवा दिलीप हिंगणकर ब. क्र.1405, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चिकटे ब. क्र.2040, पोलीस शिपाई सचिन दवंडे ब. क्र.2040 हे दिनांक 03/11/2022 रोजी चांदेकर चौक येथे ड्युटीवर असतांना त्यांना दुचाकी ज्या वर MHAV4137 असा क्रमांक नमूद असून त्यावर संशय आल्याने वाहन थांबवुन विचारपुस करून वाहनाचे कागदपत्रा बाबत विचारणा केली असता सदर वाहन चालक जवळ कोणत्याही प्रकारचे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले तसेच सदर वाहन चालक त्यास विचारल्या गेलेल्या प्रश्नाची उडवा उडवीचे उत्तरे देत होता. कागदपत्र आणून दाखवतो असे म्हणून वाहनधारक आपली दुचाकी तशीच सोडून निघून गेला. परंतु सदर वाहन चालक दुचाकी घेण्यास परत आला नाही. सदरचा वाहन चालक परत न आल्याने पोलीस अमंलदार यांनी सदर ची गाडी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे आणून डिटेन केली. पोलीस अमलदार सदर दुचाकी चे मुळ मालकाचा शोध लावले असता सदरचे दुचाकी ही डॉ. प्रमोद राहुडकर रा. अमानवाडी, ता. मालेगाव, जि. वाशिम यांची असल्याबाबत समजले. दुचाकीच्या मूळ मालकास मोबाईल वरुण संपर्क करून माहिती विचारली असता त्यांनी सदरची दुचाकी त्यांच्या मालकीची असून 2016 मध्ये बार्शीटाकळी बायपास येथुन चोरीस गेल्याबाबत कळविले व चोरी गेल्याबाबत त्यांनी पोस्टे बार्शीटाकळी अकोला येथे वाहन चोरीला गेल्याची लेखी नोंद केली असल्याबाबत कळविले.
आज दि. 15/12/2022 रोजी वाहनाचे मुळ मालक यांना सोबत बार्शी टाकली पोलीस स्टेशन येथील पोलीस अमलदार यांना हरवलेल्या गाडीचे दाखल अपराधा बद्दलचे कागदपत्र सह शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे बोलविले व सविस्तर पडताडणी करून सदर वाहन पुढील कायदेशीर कारवाई करून सदर दुचाकी मूळ मालकास परत देणे करिता पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथील पोलीस अमलदार यांचे ताब्यात दिले. मुळ मालकास आपली हरवलेली दुचाकी वाहन परत मिळेल याची अपेक्षाच नव्हती, परंतु ट्रॉफीक पोलीसांनी त्यास दुचाकी वाहन परत केल्याने त्याचे चेह-यावर वेगळाच आनंद दिसुन आला. नमूद वाहनाचे मूळ मालक यांनी ट्रॉफीक पोलीसांची वाहन परत मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शहर वाहतुक नियंत्रण शाखे तर्फे संशयित आढळून आलेले चोरीस गेलेली दुचाकी वाहन मुळ मालकास परत करून शाखेकडुन उत्कृष्ठ कामगीरी केल्याबद्दल श्री विलास पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला यांनी सदर अमलदाराचे कौतुक केले व अशीच कामगीरीची अपेक्षा नेहमी सर्व अमलदार यांचे कडून अपेक्षीत केली आहे.