माजलगाव नगरपरिषद चे मुख्य अधिकारी चंद्रकांत चव्हाण माजलगाव नगरपरिषद मध्ये अमावश्या ते अमवश्या हजर राहतात यामुळे नागरिकाचे नगरपरिषद ला चकरा मारून हालचे बेहाल होत आहे....
माजलगाव प्रतिनिधी...
माजलगाव नगरपरिषद म्हणले की कावळ्याच्या हातात दिला दरबार आणि त्यांनी हागून ठेवला कारभार अशी गत माजलगाव नगरपरिषद ची झालेली आहे नगरपालिकेत कामासाठी केव्हा सह्यासाठी रोज हजारो नागरिक येत असतात काही कामे कर्मचारी करतात व काही कामे लेवलवर होतात तर काही कामे वरिष्ठ मुळे लटकलेले राहिल्याने माजलगाव नगरपरिषद मुख्य अधिकारी चंद्रकांत चव्हाण हे टिकुन राहणार की पळापळीचे काम करणार याची चर्चा आता जनतेतून होत आहे माजलगाव नगरपरिषद मध्ये आतापर्यंत तीन मुख्य अधिकारी महिनाभर काम करून बदली करून गेलेले आहेत त्यांच्या जाण्याने बरेच दिवस माजलगाव शहरातील विकास कामे व नागरिकाचे कामे हे रगडलीआहेत सध्या माजलगाव नगरपरिषद चे मुख्य अधिकारी हे घरात बसून कामे करीत आहे असल्याचीही चर्चा माजलगाव नगरपरिषद मध्ये होत आहे माजलगाव मध्ये अनेक नवीन विकास कामे थांबविलेले आहेत मुख्याधिकारी हे नगरपरिषद मध्ये अमावस्या ते अमावस्या दिवशी येऊन कामे करतात यांच्या या रोजच्या दुखण्याला माजलगाव ची जनता वैतागली आहे आणि यांच्या या रोजच्या गैरहजरीमुळे माजलगाव च्या जनता चे आणीक कामे रगडले आहे जसे की आज माजलगाव मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत माजलगाव शहरांमध्ये प्रभाग साडेसात कोटी रुपयाचे कामे चालू आहेत क्रमांक 4 व 7 मध्ये जे सिमेंट रस्ते नाल्याचे कामे चालू आहे हे कामे मुख्य अधिकारी व इंजिनियर नसल्यामुळे अत्यंत निकृष्ट पद्धतीने गुत्तेदार हे करीत आहे तसेच माजलगाव मध्ये अनेक योजने अंतर्गत कामे रगडलेले आहेत ज्यामध्ये स्वच्छता डेंगू फवारणी अतिक्रमण पंतप्रधान घरकुल योजना रमाई घरकुल योजना अशा अनेक प्रश्न घेऊन येणारे नागरिकांना गत पाच वर्षापासून माजलगाव नगरपरिषद मध्ये चकरा माराव्या लागत आहे नागरिकांतून जिल्हाधिकारी मॅडम यांना एकच विनंती आहे की माजलगाव नगरपरिषद ला कायमस्वरूपी व कायम हाजीर राहणारा मुख्य अधिकारी व चांगला इंजिनियर देण्यात यावा आणि माजलगाव नागरिकांचे जे हालचे बेहाल होत आहे हे होणार नाही याचीही दक्षता जिल्हाधिकारी मॅडम यांनी घ्यावी अशी माजलगावकरांची मागणी आहे