बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळतात धनंजय मुंडेंचा कामाचा धडाका...
माजलगाव प्रतिनिधी..
बीड येथील प्रशासकीय इमारत व संत भगवान बाबा योजनेतील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वस्तीगृहासाठी मिळून सुमारे 41 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची आज जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली असून पहिल्या दिवशी धनंजय मुंडे च्या कामाचा धडाका आज पायाला मिळाला आहे बीड येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 30 कोटी 95 लाख तर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेतून बीड जिल्हा येथे मुलाचे वस्तीगृह उभारण्यास 9 कोटी 99 लाख रुपये इतक्या रकमेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या कामांना मान्यता देण्यात आली होती तर सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना संत भगवान बाबा शासकीय वस्तीगृह योजनेचे जनकच धनंजय मुंडे हे आहेत दरम्यान परळी येथील कृषी महाविद्यालय सोयाबीन संशोधन केंद्र त्या पाठोपाठ आता बीड येथील प्रशासकीय इमारत व ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वस्तीगृहाचा विषय मार्गी लावल्याने दुसऱ्यांदा झालेले पालकमंत्री म्हणून पुन्हा निवड झालेल्या धनंजय मुंडे यांच्या कामाचा उरक पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे