माजलगांव शहरात पोलीसांवर व विविध ठिकाणी दगडफेक , एक बँक व हॉटेल फोडले
माजलगांव( प्रतिनिधी):-
शहरात बंदच्या दरम्यान शिवाजी चौक , नवीन बस स्थानक समोर आंदोलकांनी दगडफेक केली. तर या ठिकाणी असलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली.तसेच
उघडया असलेल्या पूर्णवादी बँक व संभाजी चौकातील एका हॉटेलवर दगडफेक करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये अनेक जण जखमी झाले होते. याचा निषेध म्हणून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. माजलगांव शहरात सकाळी ११ वाजताच्या सुमारास आंदोलकांनी शिवाजी चौक या ठिकाणी थांबलेल्या पोलिसांवर दगडफेक केली त्याचबरोबर नवीन बस स्थानकासमोर देखील दगडफेक केल्याचा प्रकार घडला यात कोणीही जखमी झाली नाही. त्याचबरोबर आगारात थांबलेल्या बस वर बाजार रोड वरून दगडफेक करून एक बसच्या काचा फोडल्या.
त्याचबरोबर येथील पूर्णवादी बँक आपल्या दैनंदिन कामासाठी उघडण्यात आली असताना तिच्यावर दगडफेक करण्यात आली. यात बँकेच्या एटीएम व बँकेच्या काचा फोडण्यात आल्या. त्याचबरोबर संभाजी चौक या ठिकाणी असलेल्या सुखसागर हॉटेलवर देखील आंदोलकांनी दगडफेक केली यात हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या.