माजलगाव नगर परिषद बिल्डिंगची होणार सुनावणी
प्रतिनिधी
माजलगाव नगर परिषदेच्या बिल्डिंगचं उर्वरित काम पैशा अभावी अनेक वर्षापासून बंद होतं नगर परिषदेच्या अपूर्ण प्रशासकीय इमारतीचे उर्वरित बांधकाम हे 2020-21च्या राज्य दरसुची नुसार रू 7731130/-(रुपये सत्याहतर लक्ष एकतीस हजार एकशे तीस फक्त) या रकमेचा निधी मंजूर करण्यात आला होता
हे काम अंदाज पत्रकानुसार झाला नसल्याचे अनेक तक्रारी प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आल्या होत्या अंदाजपत्रकामध्ये संडास बाथरूमचे काम डबल दाखवले आहेत दोन साईड ने लोखंडी गेट असून एका साईडने गेट टाकल आहे तळ मजल्या पार्किंग मध्ये संडास बाथरूमची व्यवस्था करण्यात आली नाही व कोणत्याही प्रकारची स्टाईल फरशी लावली नाही व बिल्डिंग समोरील डिझाईनवर 13 लाख 5 हजार 62 रुपये खर्च केला आहे हा सर्व खर्च जास्तीचा दाखवला आहे व इतर फर्निचर खरेदी मध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे हे सर्व कामे अंदाजपत्रकानुसार झाले नसल्याची चौकशी होणार आहे व बिल्डिंग उंच असल्याने दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक यांना रॉमची व्यवस्था केली नसल्याने तत्कालीन मुख्याधिकारी विशाल भ़ोसले यांनी तळमजल्यावर स्वतंत्र कक्ष स्थापन करून या ठिकाणी दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकाचे कामे केली जातील असे पत्र जिल्हाधिकारी व प्रहार अध्यक्ष गोपाळ पैंजणे यांना तत्कालीन मुख्याधिकारी विशाल भ़ोसले यांनी दिले होते या कामात दिरंगाई झाली असून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही या सर्व कामाशी सुनावणी 26 तारखेला प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या दालनात होणार आहे असे माजलगाव प्रहारचे अध्यक्ष गोपाळ पैंजणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे