3 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा : नुमान अली चाऊस
सविस्तर वृत्त असे की, बीड शहरात अनेक वर्षांपासून भीक मागून जीवन जगणाऱ्या एका अंध महिलेच्या तीन वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर एका अल्पवयीन नराधमाने लैंगिक अत्याचार केले. अंध आईच्या कुशीत खेळणार्या 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना रात्री बीड शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली. स्काऊट भवनच्या बाजूला ही घटना घडल्याचे समजते. पोलिसांनी त्या नराधमावर गुन्हा दाखल केला असून अटक सुद्धा केली आहे. तरी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी मौलाना आजाद युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केली आहे.