पावसाळा संपत आला असताना सुद्धा सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झालेला आहे. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. माजलगाव धरण मृतसाठ्याकडे जात आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्न सुद्धा उग्ररूप घेत आहे. 2013-14 च्या दुष्काळापेक्षाही भयंकर परिस्थिती दिसत आहे. म्हणून मौलाना आझाद युवा मंच अशी मागणी करत आहे की बीड जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज सरसकट माफ करण्यात यावा, शासकीय चारा छावण्या सुरू करण्यात यावे, 100% पीक विमा देऊन त्वरित वाटप करावा, साखर कारखानदारांनी गतवर्षीच्या उसाचे उर्वरित हप्ते प्रति टन पाचशे रुपये द्यावे, एमएसईबीने शेतीला चांगल्या दाबाने 24 तास वीज पुरवठा करावा, नमो किसान योजनेची अंमलबजावणी तात्काळ जिल्ह्यात सुरू करावी. या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या नसता मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष तथा जमियते उलेमा-ए-हिंद चे माजलगाव तालुका उपाध्यक्ष नुमान अली चाऊस आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह लोकशाही पद्धतीने जिल्ह्यातील सर्व आमदारांना घेराव घालणार व सरकारमधील एक ही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही.