माजलगाव ग्रामीण रुग्णालयने डेंगू मलेरिया, चिकनगुनिया या आजारापासून बचाव करण्यासाठी घरो घरी जाऊन. जनजागृती मोहिमा राबविण्यात आली आहे...
माजलगाव प्रतिनिधी.दि.28/8/2023 रोजी माजलगाव शहरातील मा. जिल्हा हिवताप अधिकारी श्री .शिंदे विजयसिंह यांच्या आदेशावरून व तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री. जगनाडे प्रशांत यांच्या मार्गदर्शनाखाली आज माजलगाव शहरांमध्ये व प्रत्येक वार्डामध्ये जाऊन व घरोघरी जाऊन डेंगू मलेरिया पासून आपले व आपल्या पाल्याचे संरक्षण कसे करायचे हे मोहिमा माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी तोफिक पठाण यांनी ही मोहिमा राबविली आहे सध्या बीड जिल्ह्यामध्ये अनियमित पावसाळ्यामुळे नक्की असून त्यामध्ये त्रास उत्पन्न होऊन डेंगू सारख्या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढले आहे डेंगूच्या प्रसार हा डासांपासून होत असल्यामुळे डासांची उत्पत्ती रोखणे हाच त्यावरील प्रति बंधात्मक उपाय आहे पाऊस कमी पडल्यामुळे जनतेमध्ये पाणी साठवण्याचे प्रमाण वाढलेले आहे स्वच्छ साठवलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूचा एडिट नावाच्या डासाची उत्पत्ती होत आहे आणि त्याच डासांच्या मादी पासून डेंगू व चिकनगुनिया या आजाराचा प्रसार होतो त्याचबरोबर डेंगू हा नोटिफेंबल आजार असल्यामुळे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी आपल्याकडे आलेल्या प्रत्येक डेंगू रुग्णालयाची माहिती शासकीय आरोग्य संस्थेस कळवावी असे पण सांगण्यात आले आहे..डेंगू चे लक्षणे~डेंगू मध्ये हिवताप डोकेदुखी स्नायू दुखी उलट्या होणे भूक मंदावणे जास्त तहान लागणे तोंडाला कोरड पडणे डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे व डोळे लाल होणे तापामध्ये चढ उतार होणे अंगावर पुरळ येणे त्वचे खाली रक्तसाव. रक्त मिश्रित लघवी किंवा काळसर शौचास होणे पोट दुखणे नाकातून तोंडातून रक्त येणे अशी लक्षणे असल्यास त्वरित उपचार घेणे असाही सल्ला नागरिकांना देण्यात आला व तसेच लोकांना जनजागृती करण्यात आली आहे व कोरडा दिवस पाळण्याबाबत सांगण्यात आले आहे कुलर टायर झाडाच्या कुंड्या नारळाच्या करवंट्या फुलदाणी टाकी हौद माठ रांजण इत्यादी वस्तू आठ दिवसात एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन करण्यात आले व जेणेकरून साथीचे रोग उदयभवणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले सदर मोहिमा राबविण्याचे काम माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्री तोफिक पठाण यांनी व माजलगाव नगरपरिषद चे कर्मचाऱ्यांनी ही मोहिमा या वार्डात पंचशील नगर, समता कॉलनी, शाहूनगर अशोक नगर, या वार्डापासून सुरुवात केलेली आहे आणि जनतेस डेंगू मलेरिया पासून आपले व आपल्या पाल्यांचे कसे बचाव करायचे हे लोकांना घरोघरी जाऊन समजावून सांगितले व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळायचे सांगितले माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी श्री तोफिक पठाण यांनी ही मोहिमा राबविली आहे