संत ज्ञानेश्वर नगर नवीन वसाहत भाटवडगातील नागरिकांची दैना फिरणार केंव्हा ?
रस्त्यासाठी होतात हाल !
माजलगाव शहरापासून तीस फूट अंतरावर असलेल्या व नवीन भटवडगाव च्य संत ज्ञानेश्वर नगर वसाहतील नागरिकांना च्या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला असल्याने येथील नागरिकांचे हाल होत असून तात्काळ हा रास्ता रहदारी योग्य करावा अशी मागनी या भागातील नागरिकांनी केली आहे
शहराला चिटकून असलेल्या मौजे भटवडगाव येथील संत ज्ञानेश्वर नगर हा भाग जास्त लोक संख्या असलेला सर्वप्रकारचे नागरिक या भागात वास्तव्यास आहेत हे नगर शहरातच जमा असल्याने येथील नागरिकांचे सर्व व्यवहार हे येथील मुख्य रस्त्यावरून चालतात मात्र जो रस्ता आहे तो अगोदर पासून खडेमय व उखडलेला आहे त्या आता काल झालेल्या जोरदार पावसाने आणखीन खराब होऊन पूर्ण चिखलमय झाला आहे त्या मुळे येथील महिला ,शाळेत जाणारे विद्यार्थी, वृद्ध यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्या मुळे या भागातील नागरिकांच्या वेदना लक्षात घेऊन ग्रामपंचायत ने हा तात्काळ रस्ता दुरुस्त करावा नसता आम्हाला लोक शाही मार्गाने जण आंदोलन करावे लागेल अशी मागणी वैजनाथ गायके , रामकिसन कर्डिले , सुधीर जोशी , शिवाजी दळवी , सारंग पवार , विकास तपसे , ज्ञानेश्वर क्षीरसागर , पंडित ठोंगे , सरवदे मामा , दशरथ सवणे , साहेबराव राठोड , चोपडे बिंदू पाटील , पांडू दळवी व जामकर साहेब आदी नागरिक यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.