माजलगाव शहरातील महेबुब नगर मध्यिल रस्त्यावर घाण पाण्यात बेशरम झाडे लावणार -मुस्ताक कुरेशी
माजलगाव शहरातील महेबुब नगर मध्ये नगर परिषद कार्यालय कडुन मोजमाप करुण पण काही कामे करण्यात आली नाही.अनेक वेळ पत्र किंवा तक्रार देऊन पण कसल्याच प्रकारची दखल घेतली जात नसल्याने व महेबुब नगर मध्ये कोणते कामे करण्यात येत नाही तसेच कचरा उचलण्यासाठी घंटागाडी, साफसफाई किंवा झाडे, नाल्या रस्ते अश्या कोणत्याही सुविधा उपलब्ध करण्यात आले नाही.
मा.विभागिय आयुक्त साहेब व मा.जिल्हाधिकारी साहेब, यांच्या पत्रच्या आधारे तात्काळ दखल घेऊन महेबुब नगर भागातील रस्ते नाल्या करण्यात यावे. महेबुब नगर भागातील रस्ते नाल्या करावे तातडीने मुरुम टाकून घाण पाण्या पासून मुक्त करुण आरोग्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून नगरपरिषद ने तात्काळ महेबुब नगर मध्ये सोय सुविधा करावे नसता, प्रहार जनशक्ती पक्ष वतीने लोकशाही मार्गाने दि, 14 /07/2023 रोजी ठिक 10:30 वाजता महेबुब नगर मध्ये ज्या रस्त्यावर घाण पाणी वाहात आहेत त्याठिकाणी बेशरम चे झाडे लाऊन निषेध आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.