वंचित बहुजन आघाडीच्या जनाअक्रोश मोर्चास हजारोच्या संख्येने सामील व्हा- अकबर कच्छी
परळी प्रतिनिधी :- परळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अकबर कच्छी यांनी सोमवारी होणाऱ्या वंचितच्या जनाअक्रोश मोर्चास हजारोच्या संख्येने सामील होण्याचे आव्हान केले आहे ,
देशामध्ये होणाऱ्या मुस्लिम व दलितांवरील अन्याय अत्याचार व परळीतील जरीन खान यांच्या खून प्रकरणी अद्याप ही पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने व सदरील प्रकरण हे समाजातील काही दलाल पुढाऱ्यांमुळे दडपण्याचा प्रयत्न होत असून संबंधित प्रकरणात परळी मतदार संघातील व बीड जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने या प्रकरणी आतापर्यत साधी दखल ही घेतली नाही या मागचे गौडबंगाल काय?असा सवाल मुस्लिम समाजात निर्माण होत आहे जरीन खानला सशीयत आरोपी म्हणून चौकशीसाठी आणून केवळ मुस्लिम असल्याने गुन्हा दाखल नसताना मारहाण करण्यात आली यामुळे जाहीर खान कोसळून खाली पडला असता त्याला परळीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता कुठलीही नोंद न करता शासकीय डॉक्टरने मयत झाल्याचे सांगितले असता ते मारहाण करणारे पोलीस त्याच ठिकाणाहून फरार होतात मुस्लिम समाज रातोरात रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करतो मात्र याकडे केवळ मुस्लिम असल्याने याकडे पूर्ण प्रशासानाने याकडे दुर्लक्ष केले व आरोपी असलेल्या पोलिसांना 24 तासाच्या आत निलंबित करण्याऐवजी पाठीशी घालतात याची जाणीव पूर्वक तो मयत मोठा गुन्हेगार असल्याचे पोलीस प्रशासनाकडूनच सांगितले जाते ही मोठी शोकांतिका आहे तेव्हा या घटनेचा सर्व तपास सीसीटीव्ही, गुन्हा दाखल नकरता मारहाण करणे यावर सुद्धा चौकशी होई पर्यत निलंबित करावे आणि गुन्हेगाराला मनुष्यवधाचा गुन्हा तत्काळ करून आरोपींना कायमचे निलंबित करण्यात यावे या सर्व घटनेचा आम्ही मुस्लिम समाज बांधव म्हणून हजारोच्या संख्येने वंचित आघाडीच्या होणाऱ्या मोर्चास जाहीर पाठींबा देऊन सामील होण्याचे आव्हान सामाजिक कार्यकर्ते अकबर कच्छी यांनी केले आहे ...