तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कवडगाव सुशी येथे संयुक्त जयंती साजरी
गेवराई तालुका प्रतिनिधी सखाराम पोहिकर
गेवराई तालुक्यातील कवडगाव सुशी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी यांची संयुक्त जयंती मौजे कवडगाव सुशी येथे दिनांक 5 मे 2023 रोजी थाटामाटा साजरी करण्यात आली या संयुक्त जयंती निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन वंचित तालुका महासचिव किशोरजी भोले यांच्या हस्ते करण्यात आले सार्वजनिक जयंती उत्सव कवडगाव सुशी समितीचे वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड साहेब यांनी उपस्थित उपासक व उपासकांना सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी तालुका महासचिव किशोरजी भोले यांनीही नागरिकांना संबोधित केले संयुक्त जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे नेते संदीप तुरुकमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप तुरुकमारे यांनी केले या कार्यक्रमास सुशी गावातील नवतरुण फौजी प्रमुख व्याख्याते गणेश फरताडे गावचे सरपंच उपसरपंच सोसायटी संचालक तुरुकमारे मामा यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.