बांधकामावरील वस्तू चोरी का करतो असे विचारणाऱ्या युवकाला जबर मारहाण..
माजलगाव प्रतिनिधी बांधकाम वरील वस्तू चोरी का करतो असे विचारणाऱ्या शहानवाज सलीम खान वय 29 वर्ष याला चार ते पाच जणांनी बेदम मारहाण झाल्याची घटना माजलगाव येथील जुना बस स्थान काजवळ घडली या मारहाणी युवक जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र पोलिसांना ज्या कारणावरून वाद झाला मारहाण झाली तसेच कलम वगळल्याने आश्चर्य युक्त होत आहे या सर्व प्रकरणात पोलिसांनी चोरीचे कलम लावलेच नाही जे कलम लावले आहे त्या प्रकरणातील आरोपी अटक झालेले नाही विशेष म्हणजे बांधकामावरील वस्तू चोरून घेऊन जात असतानाचे व्हिडिओ असताना पोलिसांनी या गुन्ह्यात चोरीचे कलम लावलेलेच नाही.... नागरिकाचे पोलीस अध्यक्षकाना निवेदन... दरम्यान या प्रकरणात ज्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या विरोधात या भागातील नागरिकांनी पोलीस अधीक्षकाकडे निवेदनद्वारे तक्रार सादर केलेली आहे या लोकांकडून या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास दिला जातो रहिवासी व दुकानदारांना शिवीगाळ करणे धमक्या देणे दुकानासमोर मलमुत्राची घाण फेकून देणे असे प्रकार होत असल्याचा आरोप करत हा विभाग कुरेशी सलमान करीम कुरेशी सोहेल करीम कुरेशी करीम कुरेशी व इतर यांच्याविरुद्ध कारवाई करून रस्त्यावर केलेले अतिक्रमण हाटवावे असे मागणी निवेदनाद्वारे पोलीस अध्यक्ष काकडे करण्यात आली असून निवेदनावर अठरा नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.