धारुर येथील मस्जिद-ए-काजीयान ईनाम जमीनीवर लावणी करा
माजलगाव. प्रतिनिधी- उपविभागीय कार्यालय माजलगाव, च्या कार्यक्षेत्रात असलेल्या धारुर येथील मस्जिद-ए-काजीयान च्या ईनाम जमीनीचे सर्व्हे नं.१३५/अ १८४,१८५या शासन निगराणीत असलेल्या जमीनीवर २०२३-२३सालात लिलाव (लावणी )करण्यात यावी या मागणी साठी संबंधीत ईनाम जमीनीतील हक्कदारांनी मंगळवार २५एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी माजलगाव, यांच्या कार्यालया समोर उपोषण केले.
याबाबत काझी अनिसोद्दीन खमरोद्दीन,काझी हफिजोद्दीन ,काझी मुस्ताहसिन यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, सदरील सर्व्हे नं.१३५/अ १८४,१८५मधील ईनामी जमीन त्यांना परत करुन त्यावर सन-२०१८,ते २०२२या ५वर्षांत शासन निगराणीत लिलावा (लावणी) केलेली नाही.शासन निगराणीत असलेल्या जमीनीवरील काढणीस आलेल्या पिकांची चोरी धारुर येथील गुंड प्रवृत्तीचे लोक करतात.