दोन लाचखोर लिपिक एसी बी च्या जाळ्यात...
माजलगाव प्रतिनिधी आष्टी येथील प्रवास भत्याचा धनादेश मंजूर करण्यासाठी फोनवर एका लिपिकाने लाच मागितली तर धनादेश प्रदान करण्यासाठी दुसऱ्या लिपिकाने पंचा समक्ष लाच स्वीकारली या प्रकरणी आष्टी येथील लघु पाटबंधारे विभागातील दोघाजणावर एसीबीने आज दुपारी कारवाई केली आहे आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे लिपिक कुंदन अशोक गायकवाड आणि वरिष्ठ लिपिक पोपट श्रीधर गरुड असे लाचखोर लिपिक काचे नाव आहेत तक्रारदाराचा प्रवास भत्ता देयकाचा 19 हजार 410. रुपयाचा धनादेश मंजूर केल्याचा मोबदला म्हणून कुंदन अशोक गायकवाड प्रथम लिपिक मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालय उस्मानाबाद आणि पोपट श्रीधर गरुड वरिष्ठ लिपिक लघु पाटबंधारे उप विभाग आष्टी जिल्हा बीड ,( वर्ग3 ) यांनी फोनवर 2 हजार रुपयांचा लाचेची मागणी केली लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागास संपर्क केला दरम्यान पोपट चौधरी यांनी तक्रारदार यांना मंजूर झालेल्या 19.हजार.410 रुपयाचा धनादेश त्यांना प्रदान करण्यासाठी स्वता कुंदन गायकवाड यास मिळवून एकत्रित असे 20.टक्के प्रमाणे. 3 हजार 882 रुपयाची मागणी करून 3 हजार 882 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आज एसीबीने आष्टी येथील लघु पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात सापळा रचून 3 हजार 882 रुपयाची लाच स्वीकारतानाच एसीबी च्या पथकाने पोपट श्रीधर गरुड यास रंगेहात पकडले या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई संदीप आटोळे पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे पोलीस अंमलदार सुरेश सांगळे भारत गारदे संतोष राठोड अमोल खरसाडे गणेश मेह्त्रे यांनी केली.