अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी इमरान खान यांची नियुक्ती
माजलगाव।प्रतिनिधी शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते इमरान खान यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या माजलगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. इम्रान खान हे तरुण तडफदार व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून माजलगाव तालुक्यात कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी सामाजिक कार्य करताना अनेक प्रश्नांवर लढा दिला आहे. बीड जिल्हाध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना च्या माजलगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश इंदुरकर, राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे, प्रसिद्धी प्रमुख सोपणे मामा यांनी एक मताने नियुक्तिपत्र दिले असून संघटनेत कार्य करताना संघटनेच्या उद्देशाप्रमाणे भारतीय पोलीस दलातील सर्व स्तरावरच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या समस्या आपल्या संघटनात्मक कार्यातून सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहावे असे म्हटले आहे. इमरान यांना बीड जिल्हाध्यक्ष तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी अल् मरकज़ टाइम्सचे संपादक शेख एजाज़ आणि शेख शाहेद आदींची प्रमुख उपस्थिती होती. नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर इमरान खान यांनी सांगितले की, आतापर्यंत पोलीस मित्र म्हणून काम करत असल्याचा अनुभव आता संघटनेत तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना उपयोगी पडेल. संघटनेच्या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सदैव झोकून देऊन कार्य करणार असल्याचे म्हटले.