गेवराई तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट ने शेतकरी महिला गंभीर जखमी.....
राजापूर येथील एका महिलेला मोठी दुखापत...
माजलगाव प्रतिनिधी....दि. 26 एप्रिल रोजी गेवराई तालुक्यात काल झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने गेवराई तालुक्यातील फळबाग व पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे या तलवाडा व जातेगाव महसूल मंडळात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे तलवाडा पंचकोशीत तसेच गेवराई तालुक्यात अनेक ठिकाणी काल झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व अवकाळी पावसाने मिरची, बाजरी, गहू, कांदा, मोसंबी, टरबूज, डाळिंबे, खरबूज, आदी पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे तसेच घराचे व जनवाराच्या शेडचे देखील नुकसान झाले आहे व काही जनावरे ही दगावले आहे घराचे पत्र उडाल्याने राजापूर येथील एका महिलेला मोठी दुखापत झाली आहे सध्या बीडच्या खाजगी रुग्णालयात महिलेला उपचार करता पाठविण्यात आलेले आहे शिंदे सरकारने प्रशासनाला तात्काळ शेतीचे व घराच्या पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया या संघटनेचे. प्रदेश अध्यक्ष शेख अखिल अजिज.. यांच्यावतीने सर्व मागण्या होत आहे.