माजलगाव शहरातील त्या वादग्रस्त चे आज भूमी अभिलेख कार्याकडून सर्व्हे नंबरची मोजणी सुरू... कागदावरील शासकीय जमीन खुली होण्याची जनतेची अपेक्षा....
माजलगाव प्रतिनिधी.दि. 24 एप्रिल 2023 रोजी माजलगाव शहरातील बायपास रोड आझाद चौक परिसरातील सर्व्हे न. 370, 371, 372, या वादग्रस्त सव्हे नंबरची शासकीय मोजणीस अखेर भूमी अभिलेख कार्याकडून आज दिनांक 24 एप्रिल रोजी सोमवारी दुपारी 12 वा. सुरुवात झाली आहे या सव्हे नंबर मध्ये शासनाची 13 एकर 34 गुंठे जमीन असून त्यातील केवळ 37 गुंठे जमीन ताब्यात आहे तर उर्वरित 13. एकर जमीन अनेक भू माफियांनी गिशळकृत केलेली आहे या तिन्ही सव्हे बाबत मागील 10-12 वर्षात वादग्रस्त चालू असून खाजगी मोजणी मध्ये कुठेही क्षेत्र कुठेही काढल्या जाऊन येते असणाऱ्या शासनाच्या जमिनींला देखील धक्का पोहोचलेला आहे माजलगाव नगरपरिषद ने वार वार मागणी करूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून अनेक वेळा टाळाटाळ होणार शासकीय मोजणी अखेर दि.24 एप्रिल रोजी सोमवारी 12 वाजता सुरू झाली आहे या मोजणी मधून फार मोठी हेराफेरी करणाऱ्याची पाप समोर येणार असल्याने अनेकांचे धाबे दणावलेले आहेत...... तेरा एकर 34 गुंठे पैकी 1 एकर ची जमीन ताब्यात सव्हे नंबर 370 371 372 मध्ये शासन व माजलगाव नगरपरिषद ची 13 एकर 34 गुंठे जमीन आहे त्यापैकी सव्हे न. 372 मध्येच केवळ 34 गुंठे माजलगाव नगरपरिषद च्या ताब्यात असल्याचे बोलले जात आहे व उर्वरित 12 एकर 37 गुंठे जमीन गायब झालेली आहे...... अशी आहे सव्हे नंबर प्रमाणे शासकीय जमीन..सव्हे नंबर 370 मध्ये 4 एकर आहे आणि त्यातच केवळ 37 गुंठे जमीन माजलगाव नगरपरिषद च्या ताब्यात आहे त्यातील 1 एकर 3 गुंठे जमीन गायब झालेली आहे सव्हे न. 371 मध्ये 7 एकर 34 गुंठे व सव्हे न. ३७१ मध्ये 2 एकर ही जमीन गायब झालेली आहे हे सर्व गायब झालेली जमीन आभाळाने गिळली की काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.