वंचित समाजाला प्रभात आणण्यासाठी भटके विमुक्त आदिवासी विकास संशोधन केंद्राच्या वतीने कोरो इंडिया न्याय देण्याचे काम करत आहे
बीड प्रतिनिधी तालुक्यातील खेरडावाडी या ठिकाणी वंचित असलेल्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी भटके विमुक्त आदिवासी विकास केंद्राच्या वतीने कोरो इंडिया न्याय देत आहे भटके विमुक्त आदिवासी विकास संशोधन केंद्र व कोरो इंडियाच्या वतीने गेवराई तालुक्यातील मौजे खेरडा वाडी गावातील महिला व पुरुष यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सामाजिक शैक्षणिक राजकीय आरोग्य व सांस्कृतिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली तेव्हा महिला व पुरुष यांना शासन स्तरावर ऑस्ट्रेलिया विविध विभागांतर्गत योजनेची माहिती प्रशासकीय आणि अडचणी महिलांचे आरोग्य बालविवाह एकल महिलेचे प्रश्न विधवा महिलांच्या संपत्तीचा अधिकार रोजगार इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली महिला व पुरुषाकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या वरील सर्व कार्य करून घेण्यासाठी भटके विमुक्त आदिवासी विकास संशोधन केंद्राचे प्रमुख प्राध्यापक विष्णू जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली व कोरो इंडिया च्या वतीने फेलो किशोरजी भोले यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला यावेळी खेरडा वाडी गावातील महिला व पुरुषांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत खेरडा वाडी येथील नागरिकांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोरजी भोले यांनी सविस्तर अशी माहिती देऊन खेरडावाडी येथील वंचित समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही अहोरात्र करत आहोत आपल्या अडीअडचणीला आम्हाला हाक द्या आम्ही आपल्या हाकेला होकार देऊन आपले प्रश्न सोडवण्याचे काम करत राहू असे किशोरजी भोले यांनी सांगितले यावेळी भटके विमुक्त जमातीला न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे मार्गदर्शन करताना प्राध्यापक विष्णू जाधव सर यांनी आपले विचार मांडताना सांगितले .