माजलगाव धरणच्या परिसरातील हातभट्टी आड्डे उध्वस्त....
गावठी दारू वाल्याचे धाबे दणाणले आहे_माजलगाव शहर पोलिसाची कारवाई...
माजलगाव प्रतिनिधी......माजलगाव येथील धरणाच्या परिसरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीचे अड्डे माजलगाव शहर पोलिसांनी उध्वस्त केले असल्याने गावठी दारूवालेचे धाबे दणाणले आहेत तर या अंड्यावर कारवाई सुरूच राहणार असल्याचे माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी सांगितले आहे शहरासह ग्रामीण भागात हातभट्टी दारू अड्डे आहेत याबाबत शहर पोलिसांना खबऱ्यामार्फत माजलगाव धरणाच्या परिसरात हातभट्टी चे दारू काढण्याचे अड्डे असल्याची माहिती मिळाली होती या दारूमुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक युवक व्यसनाधीन झाले आहेत तर अनेकांचे संसार देखील उघड्यावर आलेले आहेत दारू पिऊन धिंगाणा घालने मुला बाळांना मारहाण या घटना रोजच होत आहे तर अनेक युवक दारू पिऊन दुचाकी वाहन चालविताना अपघात होतात तरी देखील दारू पिणे सोडत नाहीत याउलट दारूसाठी मारहाण करणे भांडण करतात त्यामुळे शहर पोलिसांनी या हातभट्टी अड्यावर कारवाई करत हे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत हे कारवाई मंगळवारी दिनांक 25 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप मोरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कदम यांनी केली आहे या कारवाईने गावठी दारू वाल्याचे धाबे दणाणले आहे.