स्वस्त धान्य दुकाने व सरकारी धान्य गोडाऊन मधील भ्रष्ट अधिकारीचे स्टीग ऑपरेशन करा..
ए आय एम आय एम चे _नवीद सिद्दिकी....
माजलगाव प्रतिनिधी... माजलगाव येथील स्वस्त धान्य दुकाने व सरकारी धान्य गोडाऊन मधले भष्ट अधिकारी चे स्टिग ऑपरेशन व जिल्हास्तरीय अधिकारी यांची समिती नेमणूक करण्यात यावी अशी मागणी ए आय एम आय एम चे पक्षाचे युवा नेते तथा माजलगाव महाराष्ट्र राज्य बांधकामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष नवीदोदिन सिद्दीकी यांनी उपजिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी केली आहे याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की माजलगाव सरकारी धान्य गोडाऊन मध्ये लाखो रुपयाचे धान्य खाजगी गोदानामध्ये राहतात ते धान्य लोक का मार्फत व काही राशन दुकानदाराच्या संगमत करून काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जात आहे एप्रिल महिन्याचा आनंदाचा शिधा किट चा पण घोटाळा दिसून येत आहे असे एक नाही तर अनेक मुद्दे आहेत यावर माजलगाव पुरवठा विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे,
सध्या शासकीय धान्य गोडाऊन मधले सीसीटीव्ही कॅमेरे पण गेल्या एक वर्षापासून बंद पडलेले आहे याचा फायदा घेऊन गोडाऊन मॅनेजर धान्य कळ्या बाजारात बिनधास्तपणे विकले जात आहे हे धान्य खानगी वाहनाने जसे मोटरसायकल ऑटो टेम्पो लावून यामध्ये बिनधास्तपणे राशन धान्य लंपास करतात खाजगी लोकामार्फत काळ्या बाजारात विकले जात आहे असे एक नाही तर अनेक मुद्दे आहेत ज्यावर पुरवठा विभागाचे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष आहे प्रत्येक गुणीतून दोन किंवा तीन किलो धान्य काढले जात आहे ज्याचे व्हिडिओ फोटो चित्र आमच्याकडे उपलब्ध आहे ते आम्ही योग्य वेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांना तो चित्र दाखवण्यात येईल गोडाऊन मॅनेजर सोळंके केव्हाही आपल्या मर्जीने गोडाऊन मध्ये ये जा करीत आहे काही खाजगीलोक लावून सरकारी धान्य गोदामाची त्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी सोपुन ते आपल्या मर्जीने ये जा करतात ही जबाबदारी सोळंके यांची असून तो गोडाऊन मध्ये सतत गैरहजर असतात ही सर्व माहिती आमच्याकडे जनतेकडूनच आलेली आहे व आमच्या ए आय एम आय एम संघटनेने स्वतः जाऊन ऑन द स्पॉट पाहणे केलेली आहे याची तहसीलदार व उपजिल्हा अधिकारी साहेबांनी सखौल चौकशी करावी व दोषीवर कठोर कारवाई करावी जर असे केले नाही तर माजलगाव तहसील कार्यालयासमोर ए आय एम आय एम पक्षाच्या वतीने व महाराष्ट्र राज्य बांधकाम गार युवा सेना संघटना कडून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नवीदोदीन सिद्दीकी यांनी आपल्या निवेदनातून दिलेला आहे.