माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव परिसरात धारदार शास्त्राने वार करून महिलेची हत्या....
माजलगाव प्रतिनिधी... माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथे एका महिलेला धारदार शास्त्राने वार करून महिलेची हत्या केली ची घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी एकाला आपल्या ताब्यात घेतलेले आहे भाटवडगाव येथील अनंत भागवत सुगडे. वय 38 वर्ष याने मयत प्रतिभा अनंत सुगडे. वय 29 वर्ष हिला तुझ्या घरांच्या नि लग्नात काहीच दिले नाही म्हणून गेल्या अनेक दिवसापासून प्रतिभाला शारीरिक व मानसिक त्रास देत काल रोजी आरोपीने पतीने पत्नीस मारहाण करून धारदार शास्त्राने पत्नीच्या शरीरावर वार केले त्यात तिला माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले अधिक उपचारासाठी बीड येथे पाठविले असता उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला याबद्दल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून मयत प्रतिभा हिचा भाऊ प्रथमेश प्रकाश पंडित ( रा. जामखेड जिल्हा नगर ) यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनंत भागवत सुगडे यांच्याविरुद्ध 133 /2023 कलम 302, 498, प्रमाणे कुणाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय दाभाडे हे करीत आहे.