परळी शहरातील दर्ग्याच्या इनामी जमीन भूमाफिया च्या घशात घालणाऱ्या मुख्य अधिकारी व दुय्यम निबंधक तहसीलदार यांच्यावर खडक कारवाई करा..
सय्यद सलीम बापू सामाजिक कार्यकर्ते..
माजलगाव प्रतिनिधी..दि.17 एप्रिल 2023 रोजी परळी वैजनाथ येथील देवस्थान च्या जमिनी सिटी सर्वे च्या नावाखाली बोगस पी पी आर च्या बऱ्याच प्रमाणात फेरफार झालेली आहे सदरील झालेल्या बेकायदेशीर ते वादग्रस्त फेर तात्काळ रद्द करून मालकी रकान्यामध्ये देवस्थानाचे नाव घेण्यात यावे व या प्रकरणी जिम्मेदार असलेले नगरपरिषद परळी चे मुख्य आधिकारी व दुय्यम निबंधक तहसीलदार व या कामी मदत करणारे सर्व अधिकारी यांच्यावर तात्काळ व कठोर कारवाई करून त्या जमिनी देवस्थानांना परत देवस्थान देण्यात यावी अशी मागणी माजलगाव येथील माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलीम बापू यांनी केलेली आहे याविषयी सविस्तर वर्त असे की परळी शहरामधील दर्गा नासरजग ची इनामी जमीन सर्वे नंबर 36 37 38 41 42 36/1,36/3 या नुसार जमिनीवर बेकायदेशीर सी टी सव्हे करून पी टी आर व इतर लोकांची नावे नोंद घेण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे 7/12 वरदेखील बोगस कागदपत्रे तयार करून भूमाफियाची संगणमत करून आपल्या मर्जीतील लोकांची नावे नोंदविण्यात आलेली आहे भूमाफियानी आपल्या बाळांच्या व राजकीय जोरावर अधिकारी लोकांना हाताशी धरून शासनाची व देवस्थानाची फसवणूक केलेली आहे भूमी अभिलेख दुय्यम निबंधक मुख्य अधिकारी नगर परिषद परळी व तहसील कार्यालयाचेअधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून शासन जीआर प्रमाणे सर्व फेरफार तात्काळ रद्द करून मालकी रकान्यामध्ये दर्गा नासरजग अशी नोंद घेण्यात यावी त्याचप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालयाने जो मोठा गोंधळ निर्माण केलेला आहे त्याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी तसेच भूमी अभिलेख कार्याकडून जे बोगस पीएम कार्ड देण्यात आले आले आहे त्याची पण सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी आम्ही आज दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी आपल्या कार्यालयासमोर हे मुद्दत उपोषण सुरू करत आहोत यादरम्यान काही अनुसूचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असे हे सलीम बापू यांनी मुख्य अधिकारी नगरपालिका परळी वैजनाथ यांना दिलेल्या निवेदनात जर आमची या निवेदनाची लवकरात लवकर दखल नाही घेतल्यास यापुढे आम्ही याच्याहून मोठे आंदोलन करणार आहोत असेही सलीम बापू यांनी म्हटलेले आहे.