माजलगाव शहरात वसूल केलेले लाखो रुपये कर्मचाऱ्यांच्या घशात नागरिकाचे पाण्यासाठी हाल.. कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रशासक अविनाश निळेकर यांचे गौडबंगाल...
माजलगाव प्रतिनिधी.... विविध करांच्या नावाखाली माजलगाव शहरातून नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये वसूल केलेले आहेत परंतु हे पैसे नगर परिषदेच्या खात्यात न जमा करता कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या घशात कोंबले आहेत त्यामुळे पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी नगरपरिषद भरू शकली नाही त्या परिणामी नागरिकाचे येत्या काही दिवसात पाण्या वाचून हाल होणार आहेत वसुलीत अफरातफर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी करूनही प्रशासक अविनाश निळेकर त्यांना पाठीशी घालत आहेत यांचे नेमके गौडबंगाल काय ? असा प्रश्न माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी प्रसिद्धी पत्रकातून विचारला आहे नगरपरिषद ने पाणीपट्टी न भरल्याने पाटबंधारे विभागाने माजलगाव शहराचा पाणीपुरवठा बंद केला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह पाण्याचे मोठे संकट माजलगाव शहर वासियासमोर उभे टाकले आहे उन्हाळ्याच्या दिवस आहेत व सर्व समाजाचे सणासुदीचे दिवस आहेत अशावेळी पाणीपुरवठा बंद होणे म्हणजे नागरिकाचे जाणून बुजून हाल करण्याचा हा प्रकार आहे वास्तविक पाहता नगरपरिषद ने घरपट्टी नळपट्टी गुंठेवारी बांधकाम परवानगी व नवीन कनेक्शन साठी दोन दोन हजार रुपये या माध्यमातून माजलगाव शहरवासी याकडून नगरपरिषद च्या पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी यांनी वसुली केली होती मोठ्या प्रमाणात वसुली केली आहे परंतु ही वसुली कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेच्या खात्यात जमा केला नाही तर ते स्वतःच्या घशात कोंबले आहे याचा एक पुरा म्हणजे बुक क्रमांक 21 यामध्ये नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये नगर परिषदेच्या खात्यात न भरता स्वाहा केल्याचे दिसून येते यासंदर्भात या कर्मचाऱ्यावर नगरपरिषद च्या चौकशी संदर्भात 23 डिसेंबर 2019 रोजी गुन्ह्यांमध्ये बुक क्रमांक 72 व गुंठेवारी संदर्भात तत्कालीन फिर्यादी कृष्णा जोगदंड यांनी उल्लेख केला आहे त्यानंतरही जिल्हा अधिकायाकडे सदरील त्या कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी दाखल आहेत ही बाब अनेक वेळेस मुख्य अधिकारी तथा प्रशासक अधिकारी अविनाश निळेकर यांच्या निदर्शनास आणून दिले आहे परंतु आजही तो कर्मचारी त्याच विभागात वसुलीचे काम करत आहे व नागरिकाकडून वसूल केलेले कराचे पैसे स्वतःच्या घशात कोंबत आहे हेच पैसे पालिकेच्या खात्यात जमा असते तर पाटबंधारे विभागाला पैसे भरणा करून माजलगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवता आला असता आशा कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याची काम प्रशासकीय अधिकारी अविनाश निळेकर हे करीत आहेत यांचे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल शेख मंजूर यांनी प्रसिद्धी पत्रकातून विचारला असून सदरील कर्मचाऱ्याकडून जमा झालेली रक्कम नगर परिषदेने वसूल करावी व माजलगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत चालू करावा अशी मागणी शेख मंजूर यांनी केलेली आहे