धारूर घाटात थरार चालत्या कारने घेतला पेट...
माजलगाव प्रतिनिधी.. किल्ले धारूर येथील घाटातून तेलगाव च्या दिशेने निघालेल्या कार ने अचानक पेट घेतल्याने काही काळा घाटातील वाहतूक बंद होती हा थरार अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये घटना कैद केली धारूर चा घाट अँन अपघात हे समीकरण बनले असून काही जण तर अपघात घाट म्हणून याचे उल्लेख करत आहे परंतु यांची रुंदीकरणाकडे प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष आहे आज शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घाटातील एका वळणावर फरार अनुभवायला मिळाला धारूर येथून तेलगाव च्या दिशेने चाललेली कार क्रमांक एम एच 14.युडी.5352 घाटाच्या खाली उतरून पायथ्याशी असलेल्या वळणा जवळ गेली असता अचानक पेट घेतला चालक व प्रवाशीनी प्रसंगावधान राखून कार मधून बाहेर पडले यामुळे मोठा अनर्थ कळला परंतु कार पूर्ण जळून खाक झाली कार जळत असल्याने काही वेळ वाहतूक बंद होती त्यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या