वैद्यकीय महाविद्यालयाचा लिपिक 37 हजाराची लाच स्वीकारताना सापडला..
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता कार्यातील एक कर्मचारी लिपीक 37 हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडला असल्याची माहिती समोर आलेली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आस्थापना विभागात काम करणारा कर्मचारी अशोक नाईकवाडे यास 37 हजार रुपयाची लाच स्वीकारताना बीड येथील लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावरील हॉटेल आशियाना येथे रंगेहात पकडले असल्याची माहिती मिळते आहे सदरील घटना अधिष्ठाता कार्यातून दुजोरा मिळाला असून अशोक नाईकवाडे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे यासंदर्भात लाचलुचपत विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार अधिष्ठाता कार्यातील लिपिक अशोक राव नाईकवाडे वय 42 वर्ष कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदारा यास यांची मयत सासरे यांच्या जागेवर त्यांचे पत्नीस अनुकंपा धर्तीवर नोकरी लावतो म्हणून 80 हजार रुपयाची मागणी केली होती नंतर 37 हजार रुपयावर तोड फोड होऊन दहा एप्रिल 2023 रोजी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील आशियाना हॉटेल येते 37 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले सदरील कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी केली यावेळी सापळा पथकात पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चाल गणेश म्हेत्रे यांचा समावेश होता.