माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात एका 15 वर्षीय तरुण युवकाचे मारहाण करून नंतर ओढणीने गळा दाबून लिंबाच्या झाडाला प्रेत लटकविन्यात आले नंतर आरोपी फरार...
माजलगाव प्रतिनिधी.. माजलगाव दि. 18 एप्रिल 2023 रोजी माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील 15 वर्षीय युवकाचे नाव गुलाम महंमद मुर्तुजा शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली नाही तर त्यास ओढणीने गळा दाबून खून केला असल्याची तक्रार वडील मूर्तुजा शेख यांनी दिंद्रुड पोलिसात तक्रार दिली या प्रकरणी तीन जणाविरुद्ध कलम 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मयत गुलाम महंमद चे वडील मूर्तुजा शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझा मुलगा गुलाम व हुजेफा मुलगी सुमारे ही आज दि 18 एप्रिल 2023 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान माझे सासरे उस्मान कासम शेख यांच्या शेतात सरपंच आणण्यासाठी गेले होते मात्र सकाळी साडेआठच्या वाजण्याच्या दरम्यान मुलगा सुमारे व मुलगा मुलगी हुजेफा हे घरी माझ्याकडे धावत पळत आले मला सांगू लागले की कैलास उर्फ पिंटू शिवाजी डाके व इतर दोघेजण दत्ता माणिक डाके यांच्या शेतात गुलाम महंमद भैय्याला खाली पाडून मारहाण करत असून सरपण आणण्यासाठी नेलेल्या ओढणीने गळा आवडत आहे यावर मी दत्ता माने गायके यांच्या शेतात पायी चालत गेलो असता माझा मुलगा गुलाम महंमद यांचा मृतदेह एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला त्यावेळी माझ्या अगोदर त्या ठिकाणी काही गावकरी होते सुलतान उस्मान शेख व त्यांचे वडील उस्मान शेख हे हजर होते त्यावर त्यांनी मला सांगितले की महादेव सुंदरराव गायके हा मला पाहून पळून गेलेला आहे तर कैलास उर्फ पिंटू डाके व हनुमंत वानखेडे हे तुझ्या गुलाम यास लिंबाच्या झाडाला लटकवत होते मात्र मला पाहून त्यांनी त्या ठिकाणाहून पळ ठोकली या प्रकरणी मयत गुलाम महंमद शेख वय 15.वर्ष यांचा खून केल्याचे प्रकरणी आरोपी कैलास उर्फ पिंटू शिवाजी डाके महादेव सुंदरराव गायके दोघेही राहणार नित्रुड तालुका माजलगाव हनुमंत वानखेडे हे राहणार टालेवाडी तालुका माजलगाव यांच्या विरुद्ध मयत वडील मुर्तुजा बशीर शेख यांनी दिंद्रुड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून तिघाविरुद्ध कलम 302, 34 नुसार दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए .पी. खोडेवाड हे करीत आहे