बीड मधील धक्कादायक प्रकार.इस्त्री, सिगारेट चे चटके देवुन छळ केल्यानंतर दिरानेच केला भाऊजयीवर बलात्कार...
माजलगाव प्रतिनिधी... चरित्रावर संशय घेत मारहाण करून इस्त्री व सिगरेटचे चटके देऊन पती व सासूने छळ केला त्यानंतर औरंगाबाद येथील नंनदेच्या घरी नेऊन त्या ठिकाणी दिरानेच भावजयीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे या प्रकरणी पती सासू आणि दिराविरुद्ध कलम 376 498 प्रमाणे बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बीड शहरातील एका विवाहितेच दि १ मार्च 2023 रोजी 24 मार्च 2023 रोजी या कालावधीत पती व सासूने प्रचंड त्रास दिला चरित्रावर संयम घेऊन इस्त्री व सिगारेट चे चटके दिले ननदेची तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगून विवाहितेला तिच्या सासूसह औरंगाबाद येथील नंनदेच्या घरी नेऊन सोडले त्या ठिकाणी दिनांक 19 मार्च 2023 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नंनदेच्या घरातच कुणीच नसल्याचे संधी साधून दिराने विवाहितेवर अत्याचार केला याची माहिती विवाहितेने पतीला दिली मात्र त्यांनी काय होते सदरची गोष्ट कुणाला सांगू नको नाहीतर तुला ठार मारेन अशी धमकी दिली या प्रकरणे पिडितीच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात पत्ती सासू आणि जिराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एपी आय अतरप हे करीत आहे.