शवविच्छेदन गुहातुन तरी बाळाच्या रडण्याचा आवाज येतो का या अपेक्षेत होता बाप...
आठ महिन्याच्या गरोदर पत्नीला अचानक ह्दय विकाराचा झटका आला आणि पत्नीचा मृत्यू झाला....
माजलगाव प्रतिनिधी बुधवारी सायंकाळी आपल्या आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीसोबत फिरत असताना आपल्या घरी आता नवीन पाहून येणार तसेच आपल्या मोठ्या मुलाला भाऊ किंवा बहिण मिळणार अशा गप्पा मारून खुशी खुशीने घरी परत आल्यानंतर नियमाने सर्व काही नित्यक्रम आटोपून सुवर्ण स्वप्न घेऊन हे दांपत्ये झोपी गेले पहाटे पती शेताकडे गेल्यानंतर अचानक आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीच्या छाती त कळा निघू लागल्या माहिती मिळताच पती व काही ग्रामस्थांनी सोबत येऊन पत्नीला तात्काळ वाहनाने जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले तिथे उपस्थित डॉक्टरांनी हा हृदयविकाराचा अटॅक आहे असे म्हणून पुढील उपचारासाठी बीड रुग्णालयात पाठविले पुन्हा वाटेल वेदना वाढल्या आणि दुसरा अटॅक आला जिल्हा रुग्णालयात पोहोचव पर्यंत गरोदर पत्नीचा प्राणज्योत मालवली होती डॉक्टरांनी मयत घोषित केले या घटनेवर विश्वास बसत नव्हता पत्नी गेली पोटातील बाळ जीवत असेल का किमान शस्त्रक्रिया करून बाळाची परिस्थिती पहा अशी विनंती केल्यानंतर मयत गरोदर मातेला वार्डात घेऊन तपासणी करण्यात आली परंतु श्वास बंद झाला होता शेवट शवविच्छेदन गृहात मयत गरोदर पत्नीला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले त्यावेळी शवविच्छेदन गृहा बाहेर उभा राहून तो पती दरम्यान पोटातील बाळ रडतेय का या अपेक्षेने वाट पाहू लागला शेवटी तो बापच ही हृदयाला हे लावून टाकणारे घटना बीड तालुक्यातील खडकी घाट येथील आहे अविनाश भोसले यांची पत्नी आठ महिन्याच्या गर्भवती असताना वरील घटना घडली हदय विकारांचे पाठोपाठ दोन अटॅक आल्याने अविनाश यांच्या पत्नीचा मृत्यू झाला दोघा पती-पत्नी खूप प्रेम होते पत्नीच्या मृत्यूची वार्ता ऐकून अविनाश कावरा बावरा झाला होता काय करावे त्याला सुचत नव्हते रात्रीच आपण पत्नी सोबत गप्पा मारत होतोत पण आज असे कसे झाले या अविश्वसनीय घटनेवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता पत्नीचा मृत्यू झाला किमान पोटातील बाळ जिवंत आहे का एवढे तरी पहा असे म्हणून अविना जोरजोराने रडू लागला डॉक्टरांनाही अविनाश ची दया आली शेवटी वार्डात घेऊन जाऊन पुन्हा तपासण्या केल्या आईचा श्वास बंद झाला बाळ श्वास कुठून घेणार शेवटी दोघांनाही मयत घोषित केले शवविच्छेदन करताना तरी आपण बाळ पाहूया अपेक्षेत तसेच पोटातून बाळ जीवन बाहेर आले तर अशा अनेक अपेक्षा घेऊन शवविच्छेदन सुरू असताना अविनाश विचार करत होता परंतु देवाची करणी म्हणावी लागेल आई आणि त्या बाळाचा मृत्यू झाला सध्या अविनाश खूप दुःखात असून आपल्या पत्नीच्या ज्या काही आठवणी शिल्लक आहेत त्या आठवणीच्या आसरावर अविनाश ला जीवन जगणे कठीण होत आहे.... त्या बाळाचा दफनविधी.. गरोदर पत्नी मयत झाल्यानंतर शवविच्छेदना दरम्यान पोटातून आठ महिन्याचे बाळ मयत झाले बाहेर काढण्यात आले पत्नीला नेमाने अग्नी देण्यात आला तर बाळाचे स्वतंत्र दफनविधी करण्यात आला खडकी गावात गुरुवारी पहाटे ही घटना घडली या घटनेने आखेगाव सून पडले होते अविनाश भोसले यांच्या दुःखात सर्व मित्र परिवार सामील आहे.