भारतचे संविधान व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज वसंत मुंडे परळी
(प्रतिनिधी) देशामध्ये गेल्या नऊ वर्षापासून विविध शासकीय योजनेमध्ये खाजगीकरण करून अनेक प्रकरणात देशातील शेतकरी शेतमजूर जवान कर्मचारी कामगार युवक वर्ग महिला न्याय हक्कापासून वंचित ठेवून ठराविक मित्र कंपनीला फायदा देऊन टॅक्स च्या रूपात प्रचंड लूट केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे केला .राहुल गांधीच्या विषयावर ओबीसी च्या नावाने केंद्र सरकार राजकारण करीत आहे . पण जात निहाय जनगणना का जाहीर केली नाही .ओबीसीचा इम्पिरियल डाटा का दिला नाही ,ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय का नाही , एससी एसटी प्रमाणे स्वतंत्र बजेटची तरतूद का केली जात नाही, ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत राजकीय आरक्षण ओबीसीला का दिले गेले नाही या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ओबीसीच्या जनतेला देण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केली. राहुल गांधी परदेशात जाऊन विरोधात वक्तव्य करतात अशा आरोप केला जातो तर चीन कोरिया अमेरिका या देशात भारताच्या पंतप्रधान आणि जाऊन अनेक विरोधात भाषणे केलेले आहेत त्या संदर्भात आपण काय कारवाई करणार हिंडनबर्ग या संस्थेने आदानी उद्योग समूहाचे प्रकरण चवाट्यावर आणल्यामुळे सरकारला खूप मोठ्या धका बसल्यामुळे राहुल गांधी विविध माध्यमातून संसदेत व संसदेच्या बाहेर भारत जोडो यात्रेमध्ये अनेक प्रश्नांवर चर्चा करून जन आंदोलन उभे केले त्यामुळे त्यांच्यावर खासदारकी अपात्रे च्या संदर्भात कारवाई करण्यात आली . केंद्र सरकारने बीएसएनएल, एमटीएनएल, कोल इंडिया ,आयआयटी, आयआयएम ,आयसी अँड सी, बी पी सी एल सेल ,एचपी, ओईपी ,गन फॅक्टर ,भेल एलआयसी ,रेल्वे ,विमानसेवा बंदरे ,मुंबई विद्युत पुरवठा, धारावी झोपडपट्टी पुनर्वसन ची सर्व खाजगीकरण करून अंबानी उद्योग समूहाला देण्यात आले असून एसबीआय वआरबीआय वर वेगवेगळ्या पद्धतीने मित्रांना सहकार्य करण्यासाठी खाजगी करण्याच्या माध्यमातून सहकार्य केल्याचा आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला आहे. अनेक मित्राचे कर्ज माफ केले असून शेतकरी, कामगार छोटा व्यापारी वेगवेगळे कर लावून जनतेला हैराण करून टाकले असून जीएसटी च्या माध्यमातून सर्व स्तरात लूट चालू आहे, पेट्रोल डिझेल गॅसची दरवाढ केली असून जीएसटी च्या माध्यमातून अनेक कर जनतेवर लादले जात आहेत व अन्नधान्य बरोबर पीठ पनीर ताक दही, गूळ चिकन सारख्या जीवनाचे वस्तूवर कर लावल्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून जनतेला वेठीस धरून अत्याचार केला आहे. परंतु देशाच्या संविधानावर हल्ले केले जात असून आरएसएस बीजेपीचा अजिंठा राबवण्यासाठी सरकार काम करीत आहे. ईडी,सीबीआयच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना हे सरकार ब्लॅकमेल करीत असून शेतकरी कामगार व जनतेचे प्रश्नावर सोडण्याचा या सरकारचा इच्छाशक्ती नसून मित्रपरिवार याना सर्व स्तरातून सहकार्य करण्याचे भावना आहे. महाराष्ट्रातील फॅक्स कॉन प्रकल्प ,टाटा एअरबस कर्नाटक सीमा प्रश्न ,वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातील गुजरात मध्ये हलवले .चिनी सैनिकांनी डोकलाम तवांग मध्ये घुसखोरी केली गुजरात मध्ये पूल कोसळला कोरोना मध्ये जनतेस वेटीस धरून लॉकडाऊन चालू केले. रेल्वे एसटी सेवा बंद केली .सरकारी उद्योगांचे खाजगीकरण केले. अग्निपथ च्या माध्यमातून कंत्राटी सैनिक बनवून आणि तारुण्यातील बेरोजगारी वाढवण्याचा प्रयत्न केला. हुकूमशाही व संविधानावर आघात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चालू केले असून देशात हुकुमशाही कडची वाटचाल चालू असल्याचा आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला . मुठभर उद्योगपतीला अच्छे दिन व सामान्य जनतेला बुरे दिन आल्याचा या सरकारकडून अन्याय केला जात आहे या सर्व प्रश्नावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ओबीसी काँग्रेसच्या विभागा मार्फत देशाचे संविधान व लोकशाहीत टिकवण्याचे आव्हान ओबीसी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केले.