माजलगावातील त्या विवाहितेला सासरच्यांनीच ठार मारले...
पत्ती सासू नंदन दिरावर 302 चा गुन्हा दाखल....
माजलगाव प्रतिनिधी... विवाहितेला जीव मारून ह्रदय विकाराचा झटका आल्याचा बनावं केल्याचा आरोप त्याचवेळी नातेवाईकांनी केला होता मात्र माजलगाव शहराचे पीआय बल्लाळ हे ऐकायला तयार नव्हते त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह थेट एस पी ऑफिस मध्ये आणला होता त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी पुन्हा इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले होते दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून काही स्थानिक पुढाऱ्यांनी हस्त पेक्षा केला होता तर काही सामाजिक कार्यकर्ते असा काहीच प्रकार घडला नाही असे छातीठोकपणे सांगत फिरत होते मात्र दिनांक 24 मार्च 2023 रोजी मयत विवाहितेचा पीएम रिपोर्ट आल्यानंतर पोलीस प्रशासनासह सर्वांचे डोळे उघडले आणि सत्यसमोर आले अखेर विवाहितेचा खून झाल्याचे उघडे किस आल्याने या प्रकरणी पतीसह चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला माजलगाव येथील शेख बानो शेख रफिक वय 35 वर्ष या महिलेचा दिनांक 26 मार्च 2023 रोजी मृत्यू झाल्याची घटना माजलगाव येथे घडली होती सासरच्या लोकांनी हिचा मृत्यू झाल्याचे माहेरच्या लोकांना कळविले होते माहेरची नातेवाईक माजलगाव येथे गेले असता मयत विवाहितेच्या डोळ्याजवळ जखम एका डोळ्यातून रक्त तर कान आणि नाकातूनही रक्त येत होते त्यामुळे नातेवाईकांनी सदरील प्रकार हा घातपाताचा असल्याचा संशय युक्त करत पोलिसांना सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती मात्र पोलीस ऐकत नसल्याने नातेवाईक मृतदेह घेऊन थेट बीडच्या एस पी ऑफिस मध्ये आले होते त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी पुन्हा चार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीम कडून पूर्ण वैद्यकीय शवविच्छेदन परीक्षण करण्याचे आदेश माजलगाव पोलिसांना दिले होते सदरील शवविच्छेदनाचा रिपोर्ट दि.24 मार्च 2023 रोजी प्राप्त झाल्यानंतर माजलगाव शहर पोलिसांनी मयत विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांना ठाण्यात बोलावून घेतले आणि त्यानुसार मयत विवाहितेचे भाऊ सय्यद तारेक अब्दुल मन्नान राहणार बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बहिण शेख बानुबी हिला सासरचे लोक नेहमी शारीरिक व मानसिक त्रास देत होते तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होते तू काळी आहेस तुझ्यासोबत लग्न करून आम्ही फसलो त असे म्हणून त्याला गुंगीचे औषध देऊन नेहमी मारहाण करायचे व मारून टाकण्याची धमकी देत होते त्यातूनच दि.5ते6 रोजी या कालावधीत बानुबी हिला सासऱ्याच्या लोकांनी त्रास देत जीव मारून टाकण्याची तक्रार दिली या प्रकरणी मयत विवाहितेचा पती शेख रफिक शेख खलील सासू शेख आरिफ उर्फ लत्तू शेख खलील दिर शेख रईस शेख खलील आणि ननंद सीमा सर्व राहणार फुलेनगर माजलगाव यांच्याविरुद्ध कलम 302 498 (अ) 323 ५०४ ३४ प्रमाणे माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दि. 25 मार्च 2023 रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.