शेतकऱ्यांना गंडावणारा भामटा केज मधून पोलिसांनी घेतला ताब्यात...
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली केज आणि परंडा पोलिसाची कारवाई 24 तासात 18 लाख रुपये सह ठक पोलिसाच्या ताब्यात आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी...
माजलगाव प्रतिनिधी प्रधानमंत्री किसान योजनेतील लाखो रुपये परस्परा उचलून शेतकऱ्यांना फसविणारे ठक परंडा पोलिसांनी केज पोलिसाच्या मदतीने अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अठरा लाख रुपये हस्तगत केले आहे याबाबतची माहिती अशी की परंडा तालुक्यातील प्रधान मंत्री किसान योजनातील शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या खात्यावरील लाखो रुपये परस्पर उचलून फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा पोलीस ठाण्यात अजय दत्तात्रेय चौरे यांच्या विरुद्ध दि.11 मार्च रोजी गु.र.न.75/2023भा.द.वी. कलम 420.471.472 यासह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली परंतु गुन्हेगार हा अत्यंत चलाख असल्याकारणाने त्याला माहिती मिळता तो खाजगी वाहनाने परभणी कडे जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली खात्रीशीर माहिती मिळताच उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सहाय्यक अधीक्षक पंकज कुमार यांच्याशी संपर्क साधून आरोपीच्या मुस्क्या आवळण्याचे कळविले सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी तात्काळ ही माहिती केस पोलीस ठाण्याचे डी बी पथकाला देऊन परंडा पोलीस पथकाला मदत करण्याचे आदेश दिले दरम्यान अजय चौरे हा दि. 12 मार्च रोजी दुपारी 4. वाजताच्या सुमारास केज येथील वकील वाडीतील घरी आल्याची माहिती डी बी पथकाला मिळाली परंडा पोलीस ठाण्याच्या माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव पोलीस नाईक दिलीप गीते शमीम पाशा यांनी झडप घालून आरोपी अजय चौरे याला ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असताना त्यांच्याकडे नगदी 18 लाख रुपये ताब्यात घेतले या प्रकरणी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मुसळे केस पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव पोलीस नाईक दिलीप गीते शमीम पाशा यांनी पुढील कारवाई केली... आरोपीला न्यायालयाने 16 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.