रमजान महिन्यात पाणी पुरवठा बंद करणार्या पाटबंधारे विभागाचा निषेध,गांधीगिरी आंदोलन करणार-शेख रशिद
माजलगाव-३ कोटीच्या पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी रमजान महिन्याचा विचार न करता तसेच उन्हाळा सुरू झाल्यामुळे पाणीसाठी सामान्य नागरिकांचे हाल करणारे पाटबंधारे विभागाचे अधिकारी नागरिकांना वेठीस धरत आहेत माजलगाव शहरासह ११ गावचा पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पंप पाटबंधारे विभागाचे अधिकारींनी सिल केलं आहे.पाटबंधारे अधिकारींनी लवकरात लवकर शहर तालुक्यातील पाणी पुरवठा चालू करा नसता पाटबंधारे विभागाचे अधिकारींना एम आय एम पक्षातर्फे फुल आणि हार देवुन गांधीगिरी आंदोलन करणार असा इशारा एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी सांगितले आहे.
सध्या मार्च महिना संपत आलेला असून सगळीकडेच शासकीय कार्यालये वसुल्यांचे तगादे वाढले आहेत त्यात नगरपालिकेसमोर एक मोठे संकट उभे राहिले असून नगरपालिकेने पाणीपट्टी न भरल्यास थेट माजलगाव धरणातून माजलगाव शहरासाठी होत असलेल्या माजलगावकरांच्या पाणीपुरवठ्याचा पंप सिल करण्यात आले आहे.
माजलगाव धरणातून माजलगावकरांसाठी पाणीपुरवठा केला जातो यासाठी पाटबंधारे विभाग विशिष्ट पाणीपट्टीची आकारणी करतो त्यानुसार माजलगाव नगर परिषदेकडे पाटबंधारे विभागाचे सुमारे ३ कोटी १० लाख रुपये बाकी येणे आहे तर पाणीपुरवठ्याच्या विहिरीवर असलेले पंप व इतर विद्युत जोडण्या यासाठीचे वीज वितरण कंपनीचे जवळपास ३ कोटी ५० लाख रुपये देणे बाकी आहे. सध्या मार्च एंडचे दिवस असल्यामुळे वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर तगादा होत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून त्यातही रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. शहरवासीयांना पाण्याची मोठी गरज सध्या आहे परंतु मागील एक ते दीड महिन्यापासून पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीसाठी नगरपरिषदेचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असताना देखील सामान्य नागरिक मात्र घरपट्टी व नळपट्टी भरण्यास असमर्थता दर्शवीत असल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी केले आहे.