जय महेश शुगरची मराठवाडा विदर्भापेक्षा तिसऱ्यांदा गाळपात हॅट्रिक..
10,लाख 69 हजार ८७ मेट्रिक टन उसाचे केले गाळप.. त्रपती कारखान्याचा गाळप हंगामा बंद..
माजलगाव प्रतिनिधी :- 2022 2023 चालू गळीत हंगामात जय महेश शुगर ने सलग तिसऱ्यांदा मराठवाडा विदर्भाला गाळपात मागे टाकत हॅट्रिक केली आहे 10 लाख 69 हजार 878 मॅट्रिक टन उसाचे गाळप केले माजलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात असलेला छत्रपती सहकारी कारखाना साखर कारखाना लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव व खांजगी तत्त्वावर असलेल्या जय महेश साखर कारखाना पवारवाडी या तीनही साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगामात 21 लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप केले असून 14 लाख 85 हजार क्विंटल साखरचे उत्पादन घेतले आहे दरम्यान छत्रपती साखर कारखान्याचा पट्टा पडला आहे शहराच्या उशाला असलेले माजलगाव धरण मागील तीन ते चार वर्षापासून पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरत असल्याने माजलगाव तालुक्यातील शेतकरी बागायती शेतीकडे वळाला आहे त्यामुळे फळबागायतीसह बहुतांश शेतकरी ऊस लागवडीवर भर देत आहे माजलगाव तालुका परिसरात 12, हजार 145 हेक्टर क्षेत्रावरील खोडवा उपलब्ध असतानाही या वर्षाचा हंगामात 17 हजार 831 हेक्टरवर नवीन ऊस लागवड झाली होती खोडवा आणि नवीन लागवडीतून 29 हजार 976 हेक्टर वर 22 लाख 84 हजार 200 मेट्रिक टन ऊस उपलब्ध झाला होता माजलगाव तालुक्यात तेलगाव परिसरात असलेल्या लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना व सावरगाव परिसरात असलेला छत्रपती सहकारी साखर कारखाना व खाजगी तत्त्वावर असलेल्या पवारवाडी येथील जय महेश साखर कारखाना या तीनही साखर कारखान्यांनी गाळप हंगामात 21 लाख ३८हजार १६१ मॅट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहेत यातून 14 लाख 85 हजार क्विंटल साखर चे उत्पादन घेतले असून छत्रपती साखर कारखान्याचा पट्टा पडला आहे तर जय महेश कारखान्याचा दि. 31 मार्च शुक्रवारी 2023 रोजी पट्टा पडणार आहे या हंगामात जय महेश ने 10 लाख 69 हजार 887 मॅट्रिक टन उसाचे गाळप करत मराठवाडा व विदर्भातील साखर कारखान्याचा गाळप तुलनेत सलग तिसऱ्यांदा ठरला व ऊस गाळपाची हॅट्रिक केलेली आहे.