*गारपीट अथवा अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकरी बांधवानी वेळत ऑनलाइन तक्रारी दाखल करण्याचे आवाहन*
बीड, दि. ७:-जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांना सुचित करण्यात येते कि, प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२३ बजाज अलियांन्झ जनरल इन्सुरन्स कंपनी लि. मार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तरी नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकरी बांधवामार्फत यासाठी वेळीच ऑनलाइन तक्रारी दाखल करण्यात यावे.
ज्या शेतकरी बांधवांचे कालच्या आणि आजच्या अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाले असतील त्यांनी वरील प्रमाणे फार्म मित्र ॲपवर किंवा बजाज इन्शुरन्स कंपनीच्या टोल फ्री नंबर वर ऑनलाईन पद्धतीने तक्रार( intimation) नोंदवावी.
आपल्या शेतात ज्या कारणामुळे नुकसान झाले असेल त्याप्रमाणे योग्य कारण निवडावे.
पीक परिस्थिती निवडताना
उभ्या पिकातील नुकसानी बाबत परिस्थितीप्रमाणे खालीलपैकी एक कारण निवडावे.
1.Innudation (क्षेत्र जलयुक्त होणे)
2.Hailstrom (गारपीट)
काढणी पश्चात नुकसान असल्यास पीक परिस्थिती निवडतानाCut and Spread निवडणे
जोखमीच्या बाबी खालील प्रमाणे निवडणे-
1.Hailstrom (गारपीट)
2.Unseaonal Rain (बगर मौसमी पाऊस)
तक्रार देताना Date of incident (प्रत्यक्ष नुकसानीची तारीख) व Date of Intimation ( तक्रारीची तारीख) यातील कालावधी 3 दिवसापेक्षा ( 72 तास ) पेक्षा जास्त असू नये, कालावधी 3 दिवसापेक्षा जास्त असल्यास तक्रार अर्ज रद्द होतो.
पिक विमा कंपनीला तक्रार देण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित क्रॉपइन्शुरन्स अप्लिकेशन पुढील लिंक द्वारे गूगल प्ले स्टोर वरून डाऊनलोडकरुन घ्यावे.
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
या ॲप चा वापर करून त्याद्वारे आपल्या नुकसानीची माहिती द्यावी.
तसेच बजाज अलियांन्झ जनरल इन्सुरन्स कंपनी लि. चे फार्ममित्र अॅपद्वारे
http://bit.ly/312ekvl
या लिंक द्वारे ही पिक नुकसानीची तक्रार देता येइल. तरी सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवावे.
कंपनीचा टोल फ्री क्रमांक :- 1800-209-5959
ई-मेल आय डी :- bagichelp@bajajallianz.co.in
अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयातील खालील विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बीड श्री बाबासाहेब जेजुरकर साहेब यांनी केले आहे.
जिल्हा विमा प्रतिनिधी
उमेश पोखरकर:-9196655 42041
तालुका प्रतिनिधी –
गेवराई,केज, बीड साठी तोशिफ कुरेशी संपर्क क्र.+918087624759
परळी (वै),वडवणी, माजलगाव साठी उमेश जाधव संपर्क क्र.+91 73879 78591
अंबाजोगाई, धारूर, शिरूर (क) साठी महावीर चिकटे संपर्क क्र.+91 84828 19082
पाटोदा,आष्टी साठी गणेश नरसाळे संपर्क क्र. +91 89757 56584