अल्पसंख्यांक स्कॉलरशिप्स, शेतकऱ्यांना मदत व मुस्लिम शादीखाने बाबत खासदार ताईंना निवेदन :- नुमान चाऊस
सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने अल्पसंख्यक समाजाला मिळणाऱ्या अनेक शिष्यवृत्ती बंद व कमी केलेल्या आहेत. या मुद्यावर बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी देशाच्या संसदेत आवाज पण उठविलेला आहे. मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप, बेगम हजरत महाल स्कॉलरशिप व प्रि-मॅट्रिक स्कॉलरशिप सह इतर शिष्यवृत्ती पुन्हा व पूर्णपणे सुरू करण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडावे व माजलगाव शहरामध्ये खासदार फंडातून मुस्लिम समाजासाठी शादी खाना उभारावा तसेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई राज्य सरकारकडून लवकरात लवकर मिळवून द्यावी या मागण्यांसाठी मौलाना आझाद युवा मंच तर्फे खासदार प्रीतम ताई मुंडे यांना देण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे व गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसा व गारपिटीमुळे शेतीचा जो नुकसान झालेला आहे त्या मोबदल्यात नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देणे बाबत व माजलगाव शहरात मुस्लिम समाजासाठी सुसज्ज शादीखाना खासदार निधीतून उभारून देण्यात यावा या मागण्यांचे निवेदन बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय प्रीतमताई मुंडे हे माजलगावला आल्या असता मौलाना आझाद युवा मंच च्या वतीने जिल्हाअध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी चर्चा करून निवेदन दिले.