माजलगाव नगर परिषदेत एकच नंबर वर घेतले दोन वेगवेगळे ठराव...
तत्कालीन मुख्य अधिकारी वर कारवाई करण्याची मागणी...
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज...
माजलगाव नगरपरिषद मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांनी एकाच नंबर वर दोन वेगवेगळ्या ठराव वेगवेगळ्या तारखेला घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे याप्रकरणी विशाल भोसले यांच्यावर माजलगाव नगरपालिका अधिनियमानुसार कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष शेख मंजूर चांद पाशा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे माजलगाव नगरपरिषद निकृष्ट कामे अनियमितता भ्रष्टाचारामुळे मागील काही दिवसांपासून माजलगाव नगरपरिषद चांगली चर्चेत आहे आमदार प्रकाश सोळंके यांच्या मागणीवरून पालखीचे विशेष लेखापरीक्षण सुरू आहे यात अनेक बारा भानगडी पुढे येत आहेत माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी प्रशासकी तत्कालीन प्रशासक असणारे मुख्य अधिकारी विशाल भोसले यांनी बोगस ठराव घेतले असल्याचे प्रकरण समोर आणले आहेत विशाल भोसले यांनी प्रशासकीय ठराव क्रमांक 56 22 सप्टेंबर 2022 रोजी घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मोंढा येथे10 दशलक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे काम करणे त्या कामाचे सुधारित अंदाजपत्र तयार करून काम करण्याचा ठराव विशाल भोसले यांनी घेतला परंतु तत्पूर्वीच हा ठराव क्रमांक 56 टाकून 30 ऑगस्ट 2022 रोजी कार्यालयीन कर्मचारी अनिल दिगंबर दडके यांची वेतन श्रेणीत पदोन्नती देण्याकरिता सेवा पुस्तके मध्ये नोंद घेणे बाबतेचा ठराव घेण्यात आला होता एकाच ठराव क्रमांक 56 वर वेगवेगळ्या दोन तारखेत दोन ठराव कसे घेतले असा प्रश्न माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी विशाल भोसले यांना उपस्थित केला असून या प्रकरणाची जिल्हा अधिकारी बीड यांच्याकडे तक्रार केली आहे व निवेदन देऊन तत्कालीन मुख्य अधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांना निलंबित करण्याची मागणी जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.... ठराव क्रमांक 56 हे बोगस.. जुन्या डंपिंग साइटवरील कचऱ्यावर बायोमेनिंग प्रक्रिया करण्यासाठी सद्गुरु बागडे बाबा एजन्सीला काम देण्यासाठी 6 जुलै 2022 रोजी ठराव घेण्यात आला होता ते ठराव घेतल्यानंतर मात्र कसलाही प्रकारचे काम केले नाही त्यामुळे ठराव क्रमांक 45 हे बोगस असून तत्कालीन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शासनाची फसवणूक केली असल्याचे शेख मंजूर चांद पाशा यांनी म्हटले आहे.