अल्पवयीन मुलीचा लावला विवाह, मुलगी सासरी राहत नसल्याने वडिलांनीच केले भयानक कॄत्य..
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज...
बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे दहावी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे इच्छे विरुद्ध लग्न लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे दरम्यान त्यानंतर मुलीने सासरी आणण्यास नकार दिल्याने माहेरच्या मंडळीने अज्ञात स्थळी सोडून गेल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे बालविवाह प्रकरणी मुलीचे आई वडील आजोबा मामा सासरा सासू पती यांच्यासह सात जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील या घटनेने एकच खडबड उडाली आहे या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील दहावी शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडला या बालविवाहात काही अडचण येऊ नये म्हणून मुलगीला अंबाजोगाई तालुक्यातील एका छोट्या गावात देण्यात आले तर विवाह केजतालुक्यातील मामाच्या गावी शेतात लग्न लावून देण्यात आले दरम्यान त्या मुलीने सासऱ्याच्या मंडळीला मला विवाह मान्य नाही मी येथे राहणार नाही असे स्पष्ट सांगितले त्यांनीही माहिती माहेरी दिली माहिती मिळताच वडील आजोबा आणि मामीने औरंगाबाद गाठून अल्पवयीन वधूला एका वाहनात बसून अज्ञात स्थळी सोडून दिले एका महिलेला हा प्रकार मुलीने सांगितला असताना तिने त्या मुलीला मदत करत मुलीला पोलीस ठाण्यात आणून सोडले सदरील अल्पवयीन वधुने पोलिसांना सगळी हकीकत सांगितली असताना दौलताबाद जिल्हा संभाजीनगर पोलिसांनी माहिती बीड जिल्ह्यातील युसुफ वडगाव पोलिसांना दिली येथे आई-वडील आजोबा मामा मामी पती सासू सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.