माजलगाव फुले पिंपळगाव येथील दारूबंदीबाबत तहसीलदार वर्षा मनाळे यांना निवेदन देताना महिला..
माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील दारूबंदीसाठी सरसावल्या महिला...
23. फेब्रुवारी माजलगाव शहरापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुले पिंपळगाव येथील दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी महिला सरसावल्या असून दारूबंदी करावी या मागणीसाठी तहसीलदारांना महिलांनी निवेदन दिले आहे फुले पिंपळगाव होत असलेल्या दारू विक्रीमुळे गावात हाणामारी भांडण असे प्रकार नेहमीच झालेले आहेत परिणाम अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त होत आहे यापूर्वीही निवेदन देण्यात आले होते यावर एकाच दारू विक्री करताना मालासह पकडण्यात आले होते त्यामुळे सुनिता कोरडे यांनी बुधवारी ता.22. फेब्रुवारी महिला सह तहसीलदारांना गावातील दारूबंदी करावे असे निवेदन दिले या वेळी रेखा साळवे वच्चाबाई साळवे सीमा साळवे आदी महिला उपस्थित होत्या या फुले पिंपळगाव महिलांनी तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर किती दिवसाच्या आत वर्षा मनाळे मॅडम काय कारवाई करतात हे बघण्याची भूमिका आहे व या महिलांना खरोखरीच न्याय मिळेल का? हेही प्रश्न निर्माण होत आहे.