केज मध्ये अनामत रक्कम न भरताच करवसुली....
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज..
केज येथील मंगळवारी व शुक्रवारी असे दोन बाजार भरतात शेतकऱ्यांना नगर पंचायत मार्फत सुविधा पुरवण्याच्या बदल्यात प्रत्येक बाजारात भाजीपाला केव्हा इतर दुकाने थाटण्याकडून नगरपंचायत कर वसुली करतो त्यासाठी प्रत्येक वर्षी लिलाव केला जातो यावर्षी नगरपंचायतीने टेंडर काढले असले तरी ते गुलदस्तातच ठेवले आहे त्याची अनामत रक्कम अद्यापही नगरपंचायतीकडे भरण्यात आली नसून कार वसुली मात्र सुरू असल्याने संशय बळावला आहे मागील आठ ते दहा महिन्यापासून नगरपंचायतीकडे अनामत रक्कम न भरताच दोघेजण हे शेतकरी आणि छोटे व्यापाऱ्याकडून मंगळवार आणि शुक्रवारी बाजार दिवशी कराची रक्कम गोळा करतात तरीही रक्कम नगरपंचायतीकडे जमा करीत नाहीत या दोघांनीही टेंडर साठी भरावी लागणारी अनामत रक्कम नगरपंचायतीकडे भरलेली नाही कारण दोघेही मंगळवारी आणि शुक्रवारी बाजाराच्या दिवशी कर गोळा करतात पण नगरपंचायतीकडे भरणा करीत नाहीत याकडे नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी डोळे झाक करीत आहेत याची चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहे..... टेंडर दोघांना दिले या प्रकरणी नगरपंचायतीचे प्रभारी मुख्य अधिकारी सुहास हजारे यांनी सांगितले की जाधव आणि तांबोळी या दोघांनी हे टेंडर दिले आहे.. एकाने धनादेश द्वारे दहा हजार रुपये अनामत रक्कम भरली असून दुसऱ्याकडून नगरपंचायतीचे 80 हजार रुपये देणे आहे.. या वसुलीसाठी आम्ही प्रयत्नशील असून या टेंडरची मुदत मार्च अखेर पर्यंत असल्याची माहिती त्यांनी पटेल 82 न्युज च्या प्रतिनिधीला बोलताना दिली आहे..... शेतकऱ्यांना सुविधा पुरवाव्यात... ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणारे शेतकरी आणि छोटी व्यापारी यांच्याकडून जर बाजारी करा पोटी रक्कम वसूल केली जाते परंतु त्या बदल्या त्यांना नगरपंचायतीकडून कोणतीही सुविधा मिळत नसल्याची तक्रार सोने सांगवी येथील शेतकरी अनंतराव त्यांनी केली आहे शुक्रवार बाजाराची एकच जागा निश्चित करण्यात यावी तसेच आवश्यक सुविधाची पूर्तता करावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.