शेतकरी परिषद घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार ऊस कापूस सोयाबीन भाव नसल्याने बाजार पेठ थंडावले...
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज..
बाजारपेठ चे अर्थकारण शेतकऱ्यावर अवलंबून आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला तरच बाजारपेठेत तिची येते मात्र कापूस सोयाबीनला योग्य भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनीमालाची साठवणूक केली आहे आहे जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे यामुळे सोयाबीनला सात हजार रुपये दर देण्यात यावे तर कापसाला दहा हजार रुपये दर देण्यात यावे आणि ऊसाला तीन हजार रुपये भाव द्यावा अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी थावरे यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला योग्य भाव देण्यासाठी लवकरच शेतकरी परिषद घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी नेते भाई गंगा भीषण यांनी दिली आहे भाई थावरे म्हणाले की गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील बाजारपेठा थंडावल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या माल ला योग्य भाव मिळाले नसल्याने हा परिणाम झाला आहे आसे ही भाई थावरे म्हणाले तसेच कापूस सोयाबीनला बाजारपेठेत चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी 70 टक्के कापूस व 40 टक्के सोयाबीन घरात साठवून ठेवले आहे जिल्ह्यातील 12. हजार शेतकऱ्यांचा विम्याचे पैसे कंपनीने अडकून ठेवले आहेत अतिवृष्टीचेअनुदान उद्यापही हे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही एकदरी शेतकऱ्याची चारी बाजूने शेतकरी अडचणी त आला असल्याने त्यांच्याकडे खरेदी विक्रीसाठी पैसे शिल्लक राहिलेले नाहीत याचा परिणाम जिल्ह्यातील बाजारपेठेवर होत आहे यामुळे सोयाबीनला सात हजार रुपये दर देण्यात यावे तर तसेच कापसाला दहा हजार रुपये दर देण्यात यावे आणि ऊसाला तीन हजार रुपये भाव देण्यात यावे अशी मागणी भाई थावरे यांनी केली आहे यासाठी लवकरच शेतकरी परिषद घेऊन अधिवेशन काळा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने त्रिव आंदोलन करण्याचा इशारा भाई गंगा भीषण थावरे यांनी दिला आहे.