माजलगाव तालुक्याचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या पोटातले आल ओठात तर भाजपच काय शिंदे गटातही जाऊ...
प्रतिनिधी... शेख अखिल अजिज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके भाजपा जाणार अशी चर्चा होती या चर्चेला आता पूर्णविराम दिल्यासारखेच विधान आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाली की मतदार म्हणत असतील तर भाजपच काय शिंदे गटात ही जाऊ असे विधान केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे खरंतर आमदार प्रकाश सोळंके यांच्या पोटातले ओठावर आले आहे बाकी काही नाही अशा चर्चा आता सोशल मीडियावर होताना दिसून येत आहे माजलगाव शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात सोमवारी दिनांक 13 रोजी शेतकऱ्यासाठी काढल्या जाणारा रस्ता रोको संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार प्रकाश सोळंके बोलत होते खरंतर राष्ट्रवादीने आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्री पदावर संधी न दिल्याने सुरुवातीपासूनच ते नाराज होते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनी जेव्हा पहाटे शपथविधी घेतला आमदार प्रकाश सोळंके चर्चेत आले होते अजित दादांनी केलेले बड शरद पवार यांनी विचारल्याशिवाय झालेले नाही असे ते म्हणाले होते त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली माझ्या यावेळी शेवटची निवडणूक असून पक्षाने मला मंत्री पदावर संधी द्यावी असे सोळंके वारंवार पक्षाला म्हणत होते मात्र पक्षांनी त्यांना मंत्रिपदावर संधी दिली नाही त्यामुळे ते नाराज असल्या चर्चा होत गेली अनेक महिन्यापासून चर्चा होत होत्या मधल्या काळात आमदार प्रकाश सोळंके देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचाही संपर्कात होते आता तर राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके या सत्तेवर आले त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांची या दोघांशी जवळीक वाढल्याने बोलले जात आहे त्यातच त्यांनी माजलगाव येथे पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे मात्र मी पक्ष बदलणार आहे या केवळ वावड्या असून माझे भाजपातील विरोधकच या वावड्याला उठवत आहे जे काही निर्णय घ्यायचा तो मतदार विचारून घेईल असे ते म्हणाले तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांचाही आमदार प्रकाश सोळंके यांनी कौतुक केले आहे.