संजय गांधी,श्रावण बाळ,विधवा घटस्फोटीत,परितक्ता महिला व जेष्ठ नागरिक या सरकारी योजने पासून वंचित : अँड सदानंद वाघमारे
बीड ( सखाराम पोहिकर ) बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्या मध्ये गेल्या तीन चार वर्षापासून बीड जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्हातील संजय गांधी . श्रावणबाळ विधवा घटस्फोटीत . परित्यक्ता यांना सरकारी योजने पासून वंचित ठेवत असल्याचा सामाजिक कार्यकर्ते अँड सदानंद वाघमारे यांनी केला आहे . संजय गांधी श्रावण बाळ घटस्फोट . विधवा तसेच परित्यक्ता महिला यांना शासकिय योजनेतुन मुलभूत गरजा व वैद्यकीय औषधोपचारासाठी पगाराची आवश्यकता असतानाही माननीय जिल्हाधिकारी याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असून गेल्या अनेक दिवसां पासून या घटकातील लोकांना वयोवृद्ध घटस्फोटीत महिलाना श्रावण बाळ संजय गांधी योजनेतील नागरिकांना भीक मागण्याची वेळ प्रशासनाने आणलेली आहे तसेच सदर योजनेतील लाभार्थ्यानी आपले सर्व कागदपत्रे प्रशासन दरबारी दाखल केली असतानाही आज तागायत आहेत त्यावर कसल्याही प्रकारची कार्यवाही होऊ शकलेली नाही ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब असतानाही याकडे जिल्हाधिकारी साहेब डोळेझाक करत असून सदर योजनेतील लाभार्थ्याना तात्काळ योजनेचा लाभ मिळून देण्यात यावा अन्यथा या सर्व योजनेतील नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनाच्या विरोधात बीड जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे विराट आंदोलन व मोर्चा काढणार आसल्याचे हि यावेळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सामाजिक कार्यकर्ते अँड सदानंद वाघमारे यांनी कळवले आहे या संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी ही निवेदनाद्वारे करणार असल्याचेही यावेळी त्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ हे मत व्यक्त केले.