PATEL 82 NEWS
मनुर मिशन जलजीवन योजनेच्या आरखड्याबाबत प्रश्न चिन्ह? माहिती देण्यास ग्रामसेवक व सरपंच यांची टाळाटाळ
माजलगाव प्रतिनिधी : मिशन जलजीवन योजनेतर्गत माजलगाव तालुक्यातील मनुर गावांमध्ये जलवाहिन्या टाकली जाणार आहेत. मात्र या योजनेच्या आराखड्याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. हा आराखडा कसा झाला आहे हे पहाण्यास नागरिकांना मिळत नाही. ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित नसतात तर सरपंच व सदस्य कर्मचारी माहिती सांगण्यास टाळाटाळ करत आहेत, असा गावकऱ्यांनी आरोप केले जात आहे.मोदी सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचा निर्णय घेत मिशन जलजीवन योजना आणली. तालुक्यातील मनुर गावांचा पाणी या योजनेमुळे मिटणार आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत या गावांसाठी १ कोटी ७६ लाख निधी मंजूर झाला आहे. मनुर गावांमधील काम सुरु झाले असून गावातील पाईप लाईन टाकण्याचे कामे करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. मात्र गावांमध्ये कसे काम केले जाणार आहे याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध झालेली नाही. या योजनेबाबत ग्रामसेवक व सरपंच यांनी तर लेखी स्वरूपात आमच्याकडे माहिती नसल्याचे सांगत आहेत. ‘आमच्याकडे या योजनेबाबत पुरेशी माहिती व अंदाजपत्रक उपलब्ध नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत’ यामुळे या योजनेचा हेतू चांगला असला तरी अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या दिरंगाईमुळे काम व्यवस्थित होणार का? असा प्रश्न केला जात आहे.
तालुक्यातील मनुर गावांमध्ये मिशन जलजीवन योजनेचा आराखडा (सर्वेक्षण) कधी झाला याची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे प्रत्येक नगरामध्ये या योजनेतून पाणी दिले जाणार आहे, असे सांगितले जात असले तरी नेमक्या कोणत्या वस्त्या यामध्ये आहेत हे समजू शकत नाही. काम सुरु झाल्यानंतर यामध्ये एखादी चूक झाली असेल तर दुरुस्त केली जाणार का? हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे काम सुरु करण्यापूर्वी या योजनेचे सर्व्हेक्षण कसे झाले आहे. याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. ‘प्रहार’चे युवक तालुका उपाध्यक्ष अविनाश ढगे म्हणाले, मिशन जलजीवन योजने अंतर्गत मनुर गावात पाणीपुरवठा योजनेचे काम केले जाणार आहे. ह्या गावांमध्ये सर्वे कसे करण्यात आले आहेत. याची माहिती उपलब्ध करून द्यावी. याबरोबर मनुर येथे ही माहिती देण्यासाठी कायमस्वरूपी एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. याबाबत आम्ही निवेदनही देणार आहोत. योजनेच्या नावाखाली गैरव्यहावर होतात व अनेकजण त्यापासून वंचित राहतात. डोंगरकिन्ही येथे कामात भष्टाचार झाल्याचे जल जीवन योजनेचे उदाहरण आहे. हे गैरव्यहावर थांबवायचे असतील तर पारदर्शकपणे काम होणे आवश्यक आहे. या योजनेच्या तक्रारींवरूनच जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.मनुर येथेही असा प्रकार होऊ नये म्हणून पारदर्शकपणे काम होणे गरजेचे आहे. अन्यथा प्रहार आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मनुर येथील अविनाश ढगे म्हणाले, मिशन जलजीवन योजना चांगली आहे. मात्र याचे काम सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन करणे आवश्यक आहे. मनुर गावात यापूर्वी २-३ पाणी योजना झालेलया आहेत. मात्र त्याचे नियोजन व्यवस्थित झाले नाही तर त्या योजना बंद पडतात. या योजनेचाही तसे होऊ नये म्हणून याची सर्व माहिती नागरिकांसाठी खुली करणे आवश्यक आहे. त्यात काही दुरुस्त्या येऊ शकतात. याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज.